शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पुण्यातून साताऱ्यात कारमधून गुटख्याची तस्करी, दोघांना अटक, सव्वालाखांचा गुटखा जप्त

By दत्ता यादव | Updated: March 18, 2024 21:15 IST

Satara Crime News: पुण्यातून साताऱ्यात कारमधून गुटख्याची तस्करी करणाऱ्या पुण्यातील दोघांना सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली. त्यांच्याकडून १ लाख २५ हजारांचा गुटखा आणि एक कार, असा सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

- दत्ता यादवसातारा - पुण्यातून साताऱ्यात कारमधून गुटख्याची तस्करी करणाऱ्या पुण्यातील दोघांना सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली. त्यांच्याकडून १ लाख २५ हजारांचा गुटखा आणि एक कार, असा सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. रमेश साखरचंद शहा (वय ४५), अभिषेक कुमार मिश्रा (२२, दोघे रा. गुरुवार पेठ, पुणे), अशी पोलिसांनी अटक केलेल्‍यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी,  पुण्याहून सातार्‍यात एका कारमधून अवैध गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याच्या गुन्‍हे प्रकटीकरण  पथकाला मिळाली. त्‍यानुसार पोलिसांनी एक पथक तयार करून सापळा लावला. सोमवारी पहाटेच्या सुमारास सदर बझार परिसरातील कूपर काॅलनीतून एक कार येत होती. ही कार पोलिसांनी अडवली. मात्र, न थांबताच चालक तेथून पसार होऊ लागला. पोलिसांनी अखेर पाठलाग करून कार थांबवली.पोलिसांनी कारची तपासणी केली असता पोत्यामध्ये भरलेला गुटखा आढळून आला. वाहन व त्‍यातील १ लाख २५ हजारांचा गुटखा देखील पोलिसांनी जप्‍त केला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने, पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार सुजित भोसले, नीलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, सचिन रिटे, सुशांत कदम यांनी कारवाई केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर