सातारा : येथील शाहूपुरी पोलिस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अर्जून दौलत पवार (रा. सैदापूर, सातारा) याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी ही कारवाई केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस ठाण्यात अर्जून पवार याच्यावर दरोडा, जबरी चोरी, मारामारी आदी विविध प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. यामुळे शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी गुन्हेगार अर्जून पवार याच्याबाबतचा तडीपार प्रस्ताव अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्यावतीने प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केला होता. तर या प्रस्तावाची चाैकशी पोलिस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांनी केली होती. त्यातच गुन्हेगार अर्जून पवार हा जामीनवर बाहेर आल्यानंतरही त्याच्यावर कारवाईचा कोणताही परिणाम झाला नव्हता. तसेच गुन्हेगारी वृत्तीमध्ये सुधारणा झाली नाही. कायद्याचा धाक नसल्याने त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही जनतेतून होत होती. त्यामुळे हा प्रस्ताव पाठविण्यात आलेला. तर गुन्हेगार अर्जून पवार याच्या तडीपार प्रस्तावावर प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनाी त्याला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले.
साताऱ्यातील सराईत गुन्हेगार अर्जून पवार दोन वर्षासाठी तडीपार
By नितीन काळेल | Published: October 27, 2023 7:03 PM