शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
4
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
5
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
6
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
7
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
8
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
9
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
10
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
11
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
12
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
13
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
14
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
15
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
16
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
17
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
18
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
19
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
20
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक

राज्यात स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात सातारा तिसरा, ९ शाळांची सर्वोत्तमसाठी निवड 

By प्रगती पाटील | Published: October 12, 2023 4:04 PM

महाराष्ट्र कचरामुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाच्या पीएलसी माॅनिटर प्रकल्पाचा पहिला टप्पा पार पडला

सातारा : शिक्षण विभागाच्या पीएलसी स्वच्छता माॅनिटर प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात सातारा जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. त्याचबरोबर राज्यात सर्वोत्तम कामगिरी १०० शाळांनी केली आहे. त्यातील ९ शाळा या सातारा जिल्ह्यातील आहेत.  यामुळे सातारा जिल्ह्याने पुन्हा डंका वाजवल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र कचरामुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाच्या पीएलसी माॅनिटर प्रकल्पाचा पहिला टप्पा २ आॅक्टोबरला पार पडला. शाळा आणि विद्याऱ्श्यांना स्वच्छता आणि माॅनिटर प्रकल्पात काय करायचे आहे याविषयी हा पहिला टप्पा होता. यामध्ये विद्यार`थी हे स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे किंवा संदेश देणार दूत नव्हते. तर कळत-नकळत झालेली चूक निदर्शनास आणून ती सुधारायला सांगणारे कडक माॅनिटर होते. विद्यार`थी वाटेल तेथे कचरा टाकणारे आणि बेफिकीरपणे थुंकणाऱ्यांना जागच्या जागी थांबवून झालेली चूक दाखवून देत होते. अशा या प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाला होता.या प्रकल्पात राज्यातील ६४ हजार १९८ शाळांनी सहभाग नोंदणी केली होती. यामध्ये ५९ लाख ३१ हजार ४१० विद्याऱ्श्यांचे १५ लाखांहून अधिक व्हिडीओ शेअर झाले. त्यामुळे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेला गती मिळण्याचेच काम झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात विद्याऱ्श्यांना स्वच्छता माॅनिटगिरी करण्याची सवय होण्यावर लक्ष केंद्रित होणार आहे. तर या प्रकल्पात सातारा जिल्ह्याने राज्यात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पाच जिल्ह्यात तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. त्यामुळे सर्वोत्तम कामगिरी केलेल्या शाळा, सहभागी शाळा, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विद्यार`श्यांचे प्राथिमक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी काैतुक केले आहे.

जिल्ह्यातील सर्वोत्तम ९ शाळा अशा...श्री वडजाईदेवी आदर्श विद्यालय पाटखळ, ता. सातारा, जिल्हा परिषद शाळा बसाप्पाचीवाडी, ता. सातारा. त्रिंबकराव काळे विद्यालय मलवडी, ता. माण, सरस्वती विद्यालय कोरेगाव. जिल्हा परिषद शाळा हिंगणगाव, ता. फलटण, जिल्हा परिषद शाळा रांजणी, ता. जावळी. जिल्हा परिषद शाळा चाफळमुले, ता. पाटण, गिरीस्थान प्रशाला व ज्युनिअर काॅलेज महाबळेश्वर. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी प्राथमिक शाळा म्हसवड, ता. माण.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSchoolशाळा