सातारा : सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या निमित्ताने बहुसंख्य तरुणाई झिंगाट झालेली असते. शहरांमध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढविल्याने काहीजण डोंगरात जातात; परंतु साताऱ्यातील शिवप्रेमींनी गडकोट रक्षणाचा जागर करून सरत्या वर्षाला निरोप दिला. तसेच नवीन वर्षाचे स्वागतही केले. यावेळी त्यांनी असंख्य तळीरामांना पोलिसांच्या हवालीही केले.साताऱ्यात धर्मवीर युवा मंचच्या वतीने शिवप्रेमी दरवर्षी किल्ले-गडकोटांची स्वच्छता करून सरत्या वर्षाला निरोप दिला जातो.याचवेळी पोलिसांचा डोळा चुकवून काहीजण डोंगरात गेलेले दिसून आले. त्यांच्याकडे दारूच्या बाटल्या, नशेली पावडर आढळून आली. मग त्यांना जागेवरच शिक्षाही करण्यात आली. शिक्षाही वेगळी होती.
अजिंक्यतारा परिसरातील पडलेल्या दारूच्या बाटल्यांच्या काचा आणि कचरा त्यांच्याकडून गोळा करून घेतला. त्यानंतर तळीरामांना पोलिसांच्या ताब्यात दिले.यावेळी धर्मवीर युवा मंचचे अध्यक्ष प्रशांत नलवडे, अतुल घाडगे, सत्यम कदम, सुशांत नलवडे, आकाश घाडगे, शुभम कदम, प्रवीण भोसले, गणेश गोरे, सागर फडतरे, विक्रम फडतरे, भरत जाधव, नीलेश चव्हाण, सागर शेळके, अमोल खोपडे उपस्थित होते.