शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

सातारा :  जिंतीमध्ये शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने वार, डोक्याला गंभीर इजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 1:31 PM

कूपनलिकेची वायर कोणीतरी तोडली? हे सांगितल्याचा राग डोक्यात ठेवून एका शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यामध्ये संबंधित शेतकऱ्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. सदाशिव सखाराम रणवरे असे जखमीचे नाव आहे. जखमीला फलटण येथे प्राथमिक उपचार करून पुण्याला हलविले आहे.

ठळक मुद्देजिंतीमध्ये शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने वार, डोक्याला गंभीर इजा कूपनलिकेची वायर तोडल्याप्रकरणी गैरसमजुतीतून हल्ला

जिंती (सातारा) : कूपनलिकेची वायर कोणीतरी तोडली? हे सांगितल्याचा राग डोक्यात ठेवून एका शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यामध्ये संबंधित शेतकऱ्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. सदाशिव सखाराम रणवरे असे जखमीचे नाव आहे. जखमीला फलटण येथे प्राथमिक उपचार करून पुण्याला हलविले आहे.सदाशिव रणवरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, स्वमालकीची जमीन गट नंबर ५३८ मध्ये कूपनलिका आहे. ते सुरू करायला गेले असता मोटार सुरू झाली नाही. त्यावेळी पाहणी केली असता सर्व्हिस वायर तुटलेली आढळून आली, ही बाब तेथून निघालेल्या भावकीतील लोकांना सांगितली.त्यावेळी शेजारी राहत असलेले समीर बाबासाहेब रणवरे हा हातात कुऱ्हाड घेऊन तेथे आला. त्या पाठोपाठ त्याची आई शीलाबाई, वडील बाबासाहेब व पत्नी अश्विनी तेथे आल्या. समीरने वायर कट केली म्हणून माझे नाव का घेतोस? असे विचारले. तेव्हा मी तुझे नाव घेत नाही, वायर तुटल्याचे मी लोकांना दाखवतोय, असे सदाशिव रणवरे यांनी त्यास सांगितले.

यावेळी समीरने चिडून शिवीगाळ करत हाताने ढकलले. त्यावेळी सदाशिव रणवरे खाली गवतावर पडले. त्यावेळी समीरने कुऱ्हाडीचे तुंब्याने सदाशिव यांच्या उजव्या पायावर मारले. पुन्हा समीरने तुला खल्लासच करतो, असे म्हणून कुऱ्हाडीने डोक्यावर वार केला. डोक्यातूनही रक्त वाहू लागले. त्यावेळी बाबासाहेब रणवरे, शीलाबाई रणवरे, अश्विनी रणवरे यांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली.घटनादरम्यान, सदाशिव रणवरे यांची चुलती सुमन विनायक रणवरे व भाचा भैया मोहिते तेथे आले. त्यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक त्याठिकाणी आले. त्यांनी उपचाराकरिता सदाशिव रणवरे यांना प्रथम उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून फलटणच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हाPoliceपोलिस