कºहाड : गेली अनेक वर्षे रखडलेल्या सातारा-कागल या सहापदरीकरण रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागला आहे. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी या कामासाठी मंगळवारी ३ हजार कोटींचा निधी जाहीर केल्याने महामार्गावरची वाहतूक अधिक सुकर होण्यास मदत होणार आहे. २००३ साली या महामार्गाचे चार पदरीकरण करतानाच नियोजित सहापदरी मार्गासाठीची जागा अधिग्रहण करून घेतल्याने सहापदरीकरणाच्या कामात अडचणींचे विघ्न येण्याची शक्यता दिसत नाही. दळणवळण सुलभ होण्यासाठी भाजप सरकारने नेहमीच रस्ते विकासाला प्राधान्य दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून २००३ मध्ये सातारा-कागल रस्त्याचे चौपदरीकरण झाले. साहजीकच वाहतुकीला याचा फायदा झाला. परंतू भविष्यात या महामार्गाची रूंदी वाढवावी लागेल हे गृहीत धरून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नियोजित सहापदरी रस्त्यासाठी म्हणून अगोदरच सात मीटर जागेचे अधिग्रहण करून घेतले आहे. त्याबाबत महामार्गाच्या दुतर्फा रोवलेले दगड हद्द दाखविताना दिसतात. साहजिकच महामार्गाच्या दुतर्फा झालेली नवीन बांधकामे ही नियमानुसारच झालेली दिसतात. त्यामुळे सहापदरीकरण करण्याच्या कामात काही तांत्रिक अडचणी समोर येतील असे वाटत नाही.कºहाड-मलकापूर-उंब्रजला सवलत... या महामार्गाच्या दुतर्फा वसलेल्या कºहाड, मलकापूर व उंब्रज या तिन्ही शहरांना २००३ साली चौपदरीकरण करताना चांगलीच झळ बसली आहे. त्याचवेळी ४५ ते ४८ मीटर अशी जागा अधिग्रहण करण्यात आली आहे. पुन्हा सहापदरीकरणासाठी येथे जादा जागा अधिग्रहण होण्याची शक्यता वाटत नाही. त्याऐवजी येथे गरजेनुसार उड्डाणपुलांना प्राधान्य दिले जाईल, असे आजवर याबाबत संघर्ष करणारे येथील नागरिक आवर्जून सांगतात.वाहनतळ कुठे कुठे... महामार्गावर अवजड वाहने अथवा इतर वाहने रस्त्यावर थांबविली जाऊ नयेत, त्यासाठी सातारा ते कागल दरम्यान दोन ठिकाणी वाहनतळ केले जाणार असल्याचे खात्रीशीर सांगितले जाते. यापैकी एक वाहनतळ सातारा ते कºहाड या दरम्यान होईल. तर दुसरे वाहनतळ कºहाड ते कागल या दरम्यान केले जाईल. असे समजते. मात्र, त्याची जागा निश्चित कोणती करण्यात आली आहे हे कोणीच सांगत नाही. |
सातारा-कागल सहापदरीकरणाचा मार्ग सुकर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 5:05 PM
कºहाड : गेली अनेक वर्षे रखडलेल्या सातारा-कागल या सहापदरीकरण रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागला आहे. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी या कामासाठी मंगळवारी ३ हजार कोटींचा निधी जाहीर केल्याने महामार्गावरची वाहतूक अधिक सुकर होण्यास मदत होणार आहे. २००३ साली या महामार्गाचे चार पदरीकरण करतानाच नियोजित सहापदरी मार्गासाठीची जागा अधिग्रहण करून घेतल्याने सहापदरीकरणाच्या कामात अडचणींचे विघ्न येण्याची शक्यता दिसत नाही.
ठळक मुद्देजागा अधिग्रहण झाल्याने अडचणींचे विघ्न नाही महामार्गावरील वाहतूक होणार अधिक सुलभदोन ठिकाणी वाहनतळ केले जाणारकºहाड-मलकापूर-उंब्रजला सवलत...