सातारा : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य आणि एकत्रित आयुष्यमान भारत योजनेत सातारा जिल्ह्यामधील २७ रुग्णालयांचा समावेश असून यामध्ये १३५६ प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यात येत आहेत. तर लाभार्थी कुटुंबांना वर्षाला पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळत आहेत. या आयुष्यमान भारत ई-कार्ड नोंदणीत सातारा राज्यात अग्रेसर असून यामुळे जिल्ह्याचा डंका पुन्हा वाजला आहे.सातारा जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना राबविण्यात येतात. या दोन्ही योजनेमध्ये १७ लाख ६२ हजार ९०० लाभार्थ्यांचा समावेश आहे. तर त्यापैकी ८ लाख २ हजार ८५९ इतके लाभार्थी आयुष्यमान भारत तसेच महात्मा ज्योतिराव फुले योजनेत ९ लाख ६० हजार ४१ लाभाऱ्थी आहेत. त्यापैकी आजअखेर ३ लाख ५ हजार ८४६ लाभार्थ्यांना ई -कार्डचे वाटप करण्यात आले आहे.उर्वरित लाभार्थ्यांची ई-कार्ड नोंदणी आणि वितरण प्रशासनामार्फत शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी ग्रामपंचायत कार्यालयामधील आपले सरकार सेवा केंद्र, महा ई-सेवा केंद्र, आशा सेविका तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक, परिचारिका, उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी, महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यामार्फत युध्द्पातळीवर देण्याची कार्यवाही सुरु आहे.राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार सातारा जिल्हा आयुष्यमान भारत दैनंदिन ई -कार्ड नोंदणीमध्ये मागील सहा दिवसांत राज्यात अग्रेसर ठरला आहे. यासाठी अधिकाऱ्यांची धडपड महत्वाची ठरली आहे. तसेच यापुढेही नोंदणी काम वेगाने करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
- मागील ३० दिवसांतील लाभार्थी नोंदणी - १,३९,०३५
- मागील ७ दिवसांत झालेल्या लाभार्थ्यांची नोंदणी - ८८,८४६
मागील ६ दिवसांत नोंदीचा तपशील२५ ऑक्टोबर - ९,६७८२६ आॅक्टोबर - ९,१६६२७ आॅक्टोबर - १६,७८०२८ आॅक्टोबर - २१,६७१२९ आॅक्टोबर - १२,८५२३० आॅक्टोबर - १६,८११
सातारा जिल्हा आयुष्यमान भारत ई-कार्ड नोंदणीमध्ये मागील सहा दिवसांत राज्यात अग्रेसर आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात ई-कार्ड नोंदणीची प्रक्रियाही युध्दपातळीवर सुरु आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक, परिचारिका, आशासेविकांकडे आधार कार्ड घेऊन जावे. यामध्ये पात्र असल्यास प्रशासनामार्फत आयोजित शिबिरात नोंदणी करावी. तसेच लाभार्थींनी स्वत: ॲन्ड्राईड मोबाईलमध्ये आयुष्यमान भारत ॲप घेऊन त्याद्वारे नोंदणी करुन ई-कार्ड काढून घ्यावे.- ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी