सातारा : ट्रान्सफॉर्मरची जळालेल्या केबलचे काम आजच्या आज झाले पाहिजे असे म्हणून वीज कंपनी कार्यालयातून कर्मचाऱ्याला बाहेर काढून दरवाजाला टाळे ठोकण्यात आले. याप्रकरणी दहा जणांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत माहिती अशी की, कोंडवे, ता. सातारा येथील मायगोल्ड कॉलनीतील ट्रान्सफॉर्मरची केबल जळाली होती. त्यामुळे पटेल (पूर्ण नाव नाही, रा. कोंडवे) व इतर आठ ते नऊजणांनी वीज कंपनीच्या करंजे शाखेतील वीजतंत्री प्रतीक हणमंत गायकवाड (वय २४, रा. शाहूपुरी, सातारा) यांना केबलचे काम आजच झाले पाहिजे म्हणून कार्यालयातून बाहेर काढले.
त्यानंतर कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. याप्रकरणी प्रतीक गायकवाड यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.