Satara Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार जोरदार सुरू आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीने छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीने आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही बाजूंनी प्रचार सुरू असून खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांनीही प्रचार सुरू केला आहे.
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी विधानसभा मतदारसंघात दौरे वाढवले आहेत. महिलांचे मेळावे सुरू आहेत. काल कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मेळावा झाला. यावेळी छत्रपती दमयंतीराजे भोसले यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
सुनेत्रा हरल्या तर अजित पवारांचे राजकीय अस्तित्व धोक्यात? काय म्हणतायत उपमुख्यमंत्री
"उदयनराजे काँग्रेससोबत असताना काँग्रेसला नेहमी भीती असायची की, उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. हे कुटुंब राजकारणात पुढे आले तर आमचे काय होणार? म्हणून काँग्रेसने उदयनराजेंना नेहमी बाजूला ठेवले, असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी काँग्रेसवर केला.
दमयंतीराजे भोसले म्हणाल्या, उदयनराजेंनी आतापर्यंत खूप परिश्रम घेतले आहे, त्यांच्यासाठी काही सोपं नव्हते. उदयनराजे राजकारणात पुढे गेले तर कोणी थांबवू शकणार नाही अंस काँग्रेसला वाटायचे, असंही दमयंतीराजे म्हणाल्या. काँग्रेसने त्यांना नेहमी सोबत घेतले पण मागेच ठेवले. आमच्या परिवाराने लोकांसाठीच काम केलं आहे. उदयनराजेंनाही हीच शिकवण आहे, त्यांना तुमची सेवा करायची आहे. उदयनराजेंनी मागच्यावेळी लगेच राजीनामा दिला होता, त्यावेळी मलाही कळालं नव्हतं. मतदारसंघातील कामासाठी त्यांनी पद सोडले.भाजपा एक विकासाचा गट आहे, आता महायुतीमध्येही त्यांना ऑफर होत्या पण त्यांनी भाजपा सोडली नाही. भाजपामधून आपली जास्त काम होतील, असंही दमयंतीराजे भोसले म्हणाल्या.
मेळाव्यांवर भर..लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंती राजे भोसले यांनीदेखील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दौरा, बैठकांचा धडाका सुरू केला आहे. मतदारसंघात त्यांनी आतापर्यंत वीस मेळावे घेतले आहेत. महिला व तरुणींशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणीदेखील त्या जाणून घेत आहेत.