Satara Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. काही उमेदवारांच्या घोषणाही झाल्या आहेत. पण, सातारा लोकसभेत महायुती आणि महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवार कोण आहे ते ठरलेलं नाही. उमेदवारीसाठी खासदार शरद पवार काल सातारा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी आरोग्याचं कारण देत निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले. यावेळी पत्रकार परिषदेत, उदयनराजेंबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. त्यानंतर, पत्रकाराने कॉलर उडवण्यासंदर्भात विचारले असता, स्वत: शरद पवारांनी कॉलर उडवून दाखवली. यावर आज खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
'तो' एक फोन आला अन् विजय शिवतारेंची बारामतीतून माघार; पत्रकार परिषदेत केला गौप्यस्फोट
'खासदार शरद पवार यांनी उडवलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उदयनराजे भोसले म्हणाले, पवारांनी माझी स्टाईल मारली याला मी काय करणार ते शरद पवार साहेब आहेत, असंही उदयनराजे भोसले म्हणाले. यावेळी शिवेंद्रराजेंना दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छावर बोलताना उदयनराजे म्हणाले, हो मी त्यांच्यासाठी पोस्ट केली, भाऊ आहे माझा आणि यापुढेही करणार, असंही खासदार उदयनराजे म्हणाले.
"सगळ्यांनी बंधुभावनेने राहिले पाहिजे, महाराजांचे विचार आचरणात आणले पाहिजे. तरच देशाची परंपरा अबाधित राहणार. या देशाला अखंडीत ठेवायचं असेलतर छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना अबाधित राहिली पाहिजे, प्रत्येकाची पाच बोटे वेगळे असले तरी प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे. राजकारणाचा भाग नंतरचा, मी राजकारण कधी केलं नाही आणि कधीच करणार नाही, असंही उदयनराजे भोसले म्हणाले.
साताऱ्यात शरद पवारांनी उडवली 'कॉलर'
साताऱ्यात उदयनराजे भोसलेंचा वेगळाचा थाट असतो. खासदार असताना किंवा नसतानाही त्यांच्या स्टाईलची नेहमीच चर्चा राजकीय वर्तुळात होत असते. उदयनराजेंनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही अनेकदा कॉलर उडवून विरोधकांना इशारा दिला होता. विशेष म्हणजे एका कार्यक्रमात स्वत: शरद पवारांनी उदयनराजेंची कॉलर उडवली होती. त्यानंतर, आता साताऱ्यात लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शरद पवार यांचा दौरा होता. त्यावेळी, त्यांनी स्वत:ची कॉलर उडवून उदयनराजेंना अप्रत्यक्षपणे चॅलेंज दिलं आहे. सध्या, शरद पवारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये, ते कॉलर उडवताना दिसून येतात.