शहरं
Join us  
Trending Stories
1
कापूस उत्पादकांना हेक्टरी पाच हजार, सोयाबीन उत्पादकांनाही मदत; सरकारची घाेषणा
2
कंगना राणौतला कानशिलात लगावणाऱ्या CISF कॉन्स्टेबलची बदली? भावाने सांगितलं सत्य
3
Hathras News: हातरसच्या भोले बाबांचा 13 एकरात 5 स्टार आश्रम, इतक्या कोटींची आहे मालमत्ता
4
टीम इंडिया दिल्लीत पोहोचली, कोहली-रोहितची पहिली झलक; विमानतळापासून हॉटेलपर्यंत चाहत्यांचा जल्लोष
5
झिकाचा वाढतोय धोका, राज्यात आठ रुग्ण; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी
6
Hathras Stampede : 23 वर्षांपूर्वी भोले बाबांना झालेली अटक; मृत मुलीला जादूने जिवंत करण्याचा केला होता दावा
7
भारतातील श्रीमंत जे स्वत:च होते वर्ल्ड बँक; 'जगत शेठ' होते सर्वात श्रीमंत व्यक्ती, इंग्रज आणि मुघलही घ्यायचे कर्ज
8
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य : ४ जुलै २०२४; आनंदवार्ता मिळणार, प्रियजनांची भेट होणार
9
शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी करणार?; आज होणार निर्णय
10
‘लाडकी बहीण’ योजनेत अडवणूक कराल तर...खबरदार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा
11
‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर
12
८० हजार जणांना परवानगी, सत्संगाला आले अडीच लाख लोक: आयोजकांवर पुरावे दडविल्याचा आरोप
13
भाजप चाणक्यांना आता काळजी विधानसभांची; कोणतेही राज्य गमावणे परवडणारे नाही
14
गिधाडांवर नजर ठेवणार ‘तिसरा डोळा’; जीपीएस टॅग लावलेली दहा गिधाडे घेणार भरारी
15
सेवा हमी कायदा अंमलबजावणीचा मुख्य सचिव घेणार महिन्याला आढावा
16
...तर शेतकऱ्यांचे पुढील हाल तरी टळतील; हवामानाचे अंदाज अचूक का ठरत नाहीत? 
17
जगातला सर्वांत छोटा व्यावसायिक चित्रकार; लियामच्या चित्रांना जगभरात पसंती
18
विरोधकांच्या सभात्यागाने राज्यसभेत रण; सभापती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली खंत
19
हा आमच्या राजर्षी शाहूंचा पुतळा नव्हे; दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील पुतळा बदला
20
आज शॉपिंग, नंतर पैसे, क्रेडिटला चांगले दिवस; तब्बल १८ लाख कोटी रुपयांचे व्यवहार

Satara Lok Sabha Result 2024: साताऱ्यात शशिकांत शिंदे आघाडीवर

By दीपक शिंदे | Published: June 04, 2024 9:41 AM

Satara Lok Sabha Result 2024: साताऱ्यात शशिकांत शिंदे आघाडीवर

सातारा : Satara Lok Sabha Result 2024 राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीस आज, मंगळवारी एमआयडीसी, कोडोली येथील जिल्हा मार्केट फेडरेशन येथे सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या मतमोजणीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी आघाडी घेतली आहे. शिंदे यांनी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांना पिछाडीवर टाकत पहिल्या फेरीत २०० मतांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजपला याठिकाणी सुरुवातीच्या कलानुसार धक्का बसला आहे. २३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून, दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

उदयनराजे भोसले यांना आतापर्यंत २५०३ मते मिळाली तर शशिकांत शिंदे यांना २७४२ मते मिळाली असून २३९ मतांनी शिंदे यांना आघाडी घेतली आहे.सातारा लोकसभेसाठी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह १६ उमेदवार रिंगणात होते. खरी लढत ही भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांच्यातच झाली. या दोघांनी मतदारसंघात प्रचाराचे रान उठवले होते. तसेच या दोघांसाठी राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील नेत्यांनी सभा झाल्याने मतदारसंघात चुरस निर्माण झाली होती.६३ टक्क्यांवर मतदानसातारा लोकसभा मतदारसंघात यंदा सुमारे तीन टक्क्यांनी मतदान वाढले. त्यामुळे ६३ टक्क्यांवर मतदान झाल्याने हा वाढता टक्का कोणाला धक्का अन् कोणाला फायदा होणार हे आज स्पष्ट होणार आहे. १८ लाख ८९ हजार ७४० पैकी ११ लाख ९३ हजार ४९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आज मार्केट फेडरेशनच्या गोदामात १५४ टेबलवर ही मतमोजणी होत आहे. यासाठी अधिकारी आणि कर्मचारी मिळून सुमारे ८०० जणांची टीम सज्ज आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShashikant Shindeशशिकांत शिंदे