सातारा : सातारा जिल्ह्यातील किमान तापमान दिवसेंदिवस कमी होत चालले असून मंगळवारी सातारा शहरात ९ अंशाची नोंद झाली. दोन वर्षांतील हे नीच्चांकी तापमान ठरले. तर थंड हवेच्या महाबळेश्वरमध्ये ११.०३ अंशाची नोंद झाली. दरम्यान, पारा खालावल्याने जिल्हाच गारठला आहे.जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून थंडी सुरू आहे. मात्र, या थंडीत सतत चढ-उतार सुरू आहे. कधी किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली येत आहे. तर काहीवेळा ढगाळ वातावरणामुळे तापमान २० अंशावरही जात आहे. मात्र, मागील चार दिवसांपासून किमान तापमानात सतत उतार आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील थंडीत मोठी झाली आहे.जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थेड हवेचे ठिकाण. या ठिकाणी यावर्षातील नीच्चांकी तापमानाची नोंद मंगळवारी झाली. ११.०३ अंश तापमान नोंदले. तर सोमवारी येथील तापमान ११.०५ अंश होते. त्याचबरोबर सोमवारी सातारा शहराचा पारा १२.०१ अंशावर आला होता.
एकाच दिवसात तीन अंशाचा उतार येऊन मंगळवारी पारा ९ पर्यंत खाली आला यामुळे नागरिक गारठून गेले. तसेच बाजारपेठेवरही या थंडीचा परिणाम झाला आहे.