सातारा : सातारा येथे सोमवार, दि. ३ आॅक्टोबर रोजी होणारा मराठा क्रांती महामोर्चा सर्वधर्म समावेशक बनत चाललाय. या वेगळ्या वैशिष्ट्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष मराठ्यांच्या राजधानीतील महामोर्चाकडे लागले आहे. सातारा शहर हिंदू-खाटीक समाज संघटनेच्या वतीने मराठा महामोर्चास पाठिंबा देण्यात आला आहे. संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. मराठा महामोर्चास बहुसंख्येने सामील होण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष संदीप कांबळे यांनी केले. यावेळी माणिकशेठ इंगवले, किरण बेंद्रे, कमलेश निकोडे, पंकज निकोडे, मनोज पलंगे, मिलिंद इंगवले, सिद्धार्थ निकोडे, अमर बेंद्रे, नरेंद्र घोणे उपस्थित होते.सातारा जिल्हा काँग्रेसच्या अल्पसंख्यांक संघटनेने मराठा महामोर्चासाठी पाठिंबा दर्शविला आहे. कऱ्हाड येथे जिल्हाध्यक्ष झाकिर पठाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मोहसीन शेख, मुबीन मुल्ला, साजिद पटेल, तौफिक शेख, सलीम बागवान, आमिर आतार, मोहसीन बागवान, उमर सय्यद आदी उपस्थित होते.अखिल महाराष्ट्र वीरशैव तेली समाज, सातारा समिती वीरशैव तेली समाजाच्या वतीने मराठा महामोर्चास पाठिंबा देण्यात आला आहे. या महामोर्चात शेकडो तेली समाजबांधव सहभागी होणार आहेत. याचे पत्र सातारा समितीचे अध्यक्ष सुरेश कळसकर, भारत बारवडे, किरण तावसकर, वसंत राजमाने, प्रशांत चिंचकर, संजय चिंचकर, राजेंद्र कळसकर, शंकरराव राजमाने, बाळासाहेब राजमाने यांनी दिले.सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट फेडरेशन, महाराष्ट्र राज्य व सातारा जिल्हा गुरव समाज संघटनेच्या वतीने मराठा महामोर्चास पाठिंबा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंची देवदेवतांची पूजा-अर्चा, देखभाल करण्यासाठी गुरव समाजाला मान दिला. निरंतर उदरनिर्वाहासाठी इनामी जमिनी दिल्या. हा महामोर्चा मराठा समाजाच्या न्याय व हक्कासाठी आहे. याचा कोणत्याही जाती-धर्माशी संबंध नाही, अशी चर्चा बैठकीत झाली. यावेळी विजयराव पोरे, भरत नुनेकर, मधुकर गुरव, नंदकुमार गुरव, माधव गुरव, हणमंत क्षीरसागर, अरविंद पांबरे, किसनराव गुरव, सुरक्षा साखरे, वनिता कण्हेरकर, रामचंद्र गुरव, सुनील पुजारी, लहुराज गुरव, चंद्रकांत पांबरे, गणेश गुरव, राजेंद्र भांडवलकर, मोहन गुरव, मुकुंद गुरव, महादेव गुरव, ज्ञानेश्वर गजधरणे, शिवलिंग क्षीरसागर, संदीप गुरव, सुहास गुरव, शैला गुरव या सर्व कार्यकर्त्यांनी व जिल्हा संघटनेने पाठिंबा दिल्याचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.सातारा जिल्हा भोई समाजाच्या वतीने मराठा महामोर्चास पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाच्या वतीने यांच्या मागण्या सनदशीर मार्गाने महामोर्चाचे आयोजन करून करण्यात येत आहे. मराठा समाजाला सातारा जिल्हा भोई समाजाने पूर्ण पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाने नेहमीच गावोगावी इतर समाजाच्या मोठ्या भावाची भूमिका पार पाडली आहे. त्यांना पाठिंबा देणे कर्तव्य आहे. यावेळी आर. बी. शिंदे, गणपत काटकर, ज्ञानेश्वर पाडळे, धनंजय पाटील, दशरथ सुपेकर, शंकरराव कांबळे, केशव करंजे, विमल पाटील, विनायक करंजे, सुरेंद्र बारंगळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)पाटीदार समाजाचा व्यापार बंद ठेवून पाठिंबासातारा सिटी कच्छ कडवा पाटीदार समाजाच्या वतीने व्यापार बंद ठेवून महामोर्चाला पाठिंबा दर्शविण्याचा निर्णय समाज बांधवांच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी अध्यक्ष करमसीभाई पटेल, शिवलालभाई पटेल, लक्ष्मण पटेल, प्रकाश पटेल, प्रवीण पटेल, हितेश पटेल, राजू पटेल, विपुल पटेल उपस्थित होते.
सातारा महामोर्चा सर्वधर्म समावेशक बनतोय
By admin | Published: September 28, 2016 10:59 PM