शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

सातारा, माढा मतदार संघात प्रचार तोफांचा धुमधडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 10:59 PM

सातारा : सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना चिन्ह वाटप झाले असून, आता खऱ्या अर्थाने प्रचाराच्या तोफा धडाडणार ...

सातारा : सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना चिन्ह वाटप झाले असून, आता खऱ्या अर्थाने प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. त्याचबरोबर येथील उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, राज ठाकरे व इतर राजकीय पदाधिकारी, मंत्र्यांच्या सभा या दोन्ही मतदार संघांत होणार आहेत.सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघांपैकी दोन मतदार संघांचा माढ्यात समावेश आहे. तर इतर सहा विधानसभा मतदासंघ साताऱ्याला जोडले आहेत. या दोन्हीही लोकसभा मतदार संघातील निवडणूक चुरशीची होत आहे. त्यामुळे एक-एक मतही सर्वच उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. साताºयात राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांच्यात प्रमुख लढत होत आहे. तर वंचित बहुजन आघाडी, बळीराजा शेतकरी संघटना, बसपा, बहुजन सोशालिस्ट पार्टी व अपक्ष असे एकूण ९ उमेदवार रिंगणात आहेत. तर माढ्यातून तब्बल ३१ उमेदवार मैदानात आहेत. माढ्यातील निवडणूक राष्ट्रवादीचे संजय शिंदे आणि भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातच प्रामुख्याने होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे विजयराव मोरे यांच्यासह इतर पक्षांचे व अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत.दोन्हीही मतदार संघांतील उमेदवारांना सोमवारी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले. त्यामुळे खºयाअर्थाने प्रचार यंत्रणा आणखी गतिमान झालीय. उमेदवार त्यांचे कार्यकर्ते आपले चिन्ह मतदारांपर्यंत कसे पोहोचेल, यासाठी मोहीम तीव्र करीत आहेत. त्याचबरोबर विविध पक्षाच्या वतीने सभांचे आयोजन करण्यात आले आहे.उमेदवाराला चिन्ह वाटप झाल्यानंतर पहिलीच सभा होत आहे ती माढा मतदार संघात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दि. १० रोजी दोन या ठिकाणी सभा घेणार आहेत. सातारा जिल्ह्यात फलटण येथे तसेच पंढरपूर तालुक्यातील वाडी कुरोली येथे या सभा होणार आहेत. शिवसेनेचे आदित्य ठाकरे हे १२ रोजी कोरेगाव येथे प्रचार सभा घेणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी माढ्यातील भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासाठी दि. १७ ला अकलूज (ता. माळशिरस) येथे सभा घेणार आहेत. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेही सातारा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसलेयांच्यासाठी स्वतंत्रपणे कराड येथे सभा घेणार आहेत.सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर दि. २० ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेचे नियोजन करण्यात येत आहे. तर २१ रोजी याच मैदानावर महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सभा घेणार आहेत.वंचित बहुजन आघाडीचे साताºयातील उमेदवार एस. के. ऐवळे यांच्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सभा होणार आहे. कºहाडमध्ये या सभेचे नियोजन करण्यात येत असले तरी तारीख अंतिम झालेली नाही.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा आणि माढा मतदारसंघात विविध राजकीय पक्षांकडून नेत्यांच्या सभांची तारीख अंतिम करणे व इतर बाबींसाठीची पूर्तता सुरूच आहे. तरीही या नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण आणखी ढवळून निघणार आहे. आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी झडणार असून याकडे राजकीय नेत्यांबरोबरच मतदारांचेही लक्ष लागून राहिल्याचे दिसून येत आहे.