सातारा : मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. बुधवारी सकाळपासूनच पूजेसाठी आवश्यक असणारी फळे आणि फुले विक्रीसाठी शहराच्या मुख्य चौकात पाहायला मिळाली.
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महिला पूजा मांडून देवीची आराधना करतात. घरात धनधान्य आणि सुख समृध्दीसाठी ही पूजा केली जाते. या पूजेसाठी आवश्यक असणारी पाच फळे बाजारात तीस रुपयांपर्यंत मिळत आहेत. तर दहा रुपये एक प्लेट फुलांचा दर आहे.
गेल्या काही महिन्यांत फळांचे दर गगनाला भिडले होते. मार्गशीर्ष महिन्याच्या प्रारंभीच दरांची भरारी वाढल्याने सामान्यांना परवडतील या बेताने तीस रुपयांत फळे मिळत असल्यामुळे समाधानाचे वातावरण आहे. बुधवारी सकाळपासूनच बाजारपेठेत फळे आणि फुले खरेदीसाठी महिलांची लगबग दिसत होती.