औंध : खटाव तालुक्यातील भोसरे येथील पाणी फाउंडेशनच्या सराव केंद्राला विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी भेट दिली. तत्पूर्वी त्यांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जन्मभूमीचे दर्शन घेऊन भोसरेची शिवारफेरी केली.यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विश्वास गुजर, सभापती संदीप मांडवे, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी नरेंद्र मेढेवार, अनिल पवार, सरपंच महादेव जाधव, चेअरमन संतोष जाधव, नितिन जाधव-पाटील , जितेंद्र शिंदे, भाऊ जाधव, विष्णू जाधव, भीमराव जाधव, ग्रामसेवक दादासाहेब गावडे, विलास काळे उपस्थित होते.दळवी म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान व पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावागावात झालेल्या जलक्रांतीमुळे दुष्काळाची पुनरावृत्ती रोखण्यासाठी मोठी मदत झाली. भोसरेत झालेली जलक्रांती ही ग्रामस्थांच्या एकीचे फलित आहे. प्रत्येकाने स्वत:पासून सुरूवात केली की आपोआप लोकसहभागाची कामे होतात. भोसरे गावाची चर्चा जशी महाराष्ट्रात आहे, तशी गावाची चर्चा सुद्धा झाली पाहिजे. पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले पाहिजे यासाठी सर्वांनी मिळून मिसळून राहावे. तहसीलदार विश्वास गुजर, सभापती संदीप मांडवे यांनीही मनोगत व्यक्त केले.वॉटर सरप्लसकडे वाटचाल कराभोसरेत मार्च महिन्यात भरलेले बंधारे पाहून विभागीय आयुक्त दळवी अत्यंत आनंदित झाले. आता वॉटर बजेट तर आहेच पण वॉटर सरप्लसकडे वाटचाल करा, असा सल्ला त्यांनी दिला.
सातारा : पाणी फाउंडेशनच्या भोसरे केंद्राला चंद्रकांत दळवी यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:27 PM
खटाव तालुक्यातील भोसरे येथील पाणी फाउंडेशनच्या सराव केंद्राला विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी भेट दिली. तत्पूर्वी त्यांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जन्मभूमीचे दर्शन घेऊन भोसरेची शिवारफेरी केली.
ठळक मुद्देपाणी फाउंडेशनच्या भोसरे केंद्राला चंद्रकांत दळवी यांची भेटजलसाठा समाधान : जलक्रांतीमुळे दुष्काळाची पुनरावृत्ती रोखणे शक्य