सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाढे फाटा परिसरात रात्री उशिरा सातारा शहर पोलिसांनी मांडूळ या दुर्मीळ जातीचा साप विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांचा मांडूळ साप जप्त केला.याबाबत माहिती अशी की, सहायक पोलीस निरीक्षक चेतन मचले यांच्या पथकाने वाढे फाटा येथे सापळा रचला. त्यावेळी वाढे फाटा परिसरात दोन तरुण दुचाकीवरून एका पोत्यात मांडूळ घेऊन जात होते. त्यांना पथकाने शिताफीने पकडून त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये किमतीचा मांडूळ हा साप जप्त केला. तसेच दोघांना ताब्यात घेतले. त्यापैकी एक अल्पवयीन आहे.
याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कुणाल सतीश पाटोळे (रा. खंडोबाचा माळ, सातारा) याला अटक केली आहे. या कारवाईत पोलीस नाईक राहुल खाडे, झोपळे, अनिल स्वामी यांचा सहभाग होता. पोलीस उपनिरीक्षक वंजारी तपास करीत आहेत.