ठळक मुद्देसैदापूर येथे मोबाईल शॉपी फोडलीचोरट्यांनी शटर उचकटून आत केला प्रवेश
सातारा : सैदापूर येथील मोबाईल शॉपी मंगळवारी रात्री चोरट्यांंनी फोडून दोन मोबाईल व रोख रक्कम असा एकूण २९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.याबाबत माहिती अशी की, तुलसीदास गणपत चव्हाण (वय ६१, रा. करंजे, ता. सातारा) यांची सैदापूर, ता. सातारा येथे मोबाईल शॉपी आहे. मंगळवारी रात्री चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला.
दुकानातील दोन मोबाईल व रोख असा एकूण २९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.