सातारा : शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नगरपालिकेने कंबर कसली असून, प्लास्टिक पिशव्या व तत्सम वस्तूंचा वापर करणाºयांवर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मंगळवारी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या नेतृत्त्वाखाली आरोग्य विभागाच्या पथकाने शहरातील सहा व्यापाºयांवर कारवाई करून संबंधितांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूूल केला. तसेच एकूण २० किलो प्लास्टिकचा साठा जप्त केला.प्लास्टिक वापरण्यास सुलभ असल्याने त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु प्लास्टिकचं विघटन होण्यास बराच काळ लागतो. त्यामुळे न्यायालयाने राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू केला. महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. या मोहिमेंतर्गत पालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाकडून शहरातील व्यापारी, दुकानदारांची कसून तपासणी केली जात आहे. प्लास्टिक पिशव्या व तत्सम वस्तू आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे.दि. २६ सप्टेंबर रोजी आरोग्य पथकाने एकूण तीन व्यापाºयांवर कारवाई करून सुमारे ४० किलो प्लास्टिक जप्त केले होते. तसेच संबंधितांकडून वीस हजारांचा दंडही वसूल केला होता. मंगळवारी सकाळी या पथकाकडून मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या नेतृत्वाखाली मार्केट यार्ड, भवानी पेठ व सदाशिव पेठेतील दुकानदार व व्यापाºयांची तपासणी करण्यात आली. यावेळी एकूण सहा व्यापाºयांकडे प्लास्टिक पिशव्या, स्ट्रॉ, प्लास्टिक रॅपर्स पेपर तसेच पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग आदी वस्तू आढळून आल्या. संबंधित व्यापाºयांवर प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली असून, या कारवाईत सुमारे वीस किलो प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला आहे.या कारवाईत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे बाबासाहेब कुकडे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे, प्रवीण यादव, दत्तात्रय रणदिवे, गणेश टोपे, मुकादम संदीप पाचपुते यांच्यासह सहा आरोग्य कर्मचाºयांनी सहभाग घेतला.या व्यापाºयांवर कारवाईराजेंद्र वाघमारे (शिवम ट्रेडर्स, मार्केट यार्ड), अनिल शेळके (बालाजी नमकीन, मार्केट यार्ड), संतोष मोहिते (मोहिते किराणा), दिनेश कोठारी (गुरुनाथ कृपा, भवानी पेठ), प्रशांत पाठकर (शिरीष स्टोअर्स, भवानी पेठ), इम्रान मोमीन (सदाशिव पेठ).आतापर्यंत २४ जणांवर कारवाईप्लास्टिक पिशव्या व तत्सम वस्तूंची विक्री करणाºया एकूण २४ दुकानदार व व्यापाºयांवर आतापर्यंत आरोग्य पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. या माध्यमातून आरोग्य विभागाच्या पथकाने एकूण १ लाख २५ हजारांचा दंडही वसूल केला आहे.
सातारा नगरपालिकेचा ‘षटकार’;सहा व्यापाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 11:53 PM