शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
4
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
5
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
6
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
7
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
8
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
9
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
10
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
11
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
12
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
13
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
14
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
15
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
16
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
17
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
19
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
20
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

Satara: जमीन विक्रीच्या कमीशनमधून खून; दोन महिन्यानंतर घटना उघडकीस

By नितीन काळेल | Published: October 26, 2023 2:19 PM

मृतदेह खंडळा तालुक्यात पुरला : सातारा शहर ठाण्यात चौघांवर गुन्हा 

सातारा : जमीन विक्री कमिशनच्या वादातून एकाचा खून करुन मृतदेह खंडाळा तालुक्यात पुरण्यात आला. मात्र, आॅगस्ट महिन्यातील हा प्रकार दोन महिन्यानंतर उघडकीस आला असून याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात चाैघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी शहर ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे यांनी तक्रार दिलेली आहे. या तक्रारीनुसार शिवाजी नामदेव शिंदे (रा. सैदापूर, सातारा), अक्षण चव्हाण (पूर्ण नाव नाही, कोंडवे, ता. सातारा), विशाल उर्फ भैय्या खवळे (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सतारा) आणि सुमीत भोसले (पूर्ण नाव नाही, रा. पाडेगाव, ता. खंडाळा) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.  पोलिसांनी सांगितले की, संशियत शिवाजी शिंदे याचे संदीप संकपाळ यांच्याबरोबर जमीन विक्री कमीशनवरुन वाद झाला होता. यातून चिडून संदीप संकपाळ यांना २१ आॅगस्ट २०२३ रोजी साताऱ्यातील पोवई नाक्यावरुन संशयितांनी नेले. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी दोनच्या सुमारास संकपाळ यांचा गळा आवळून खून करण्यात आला. तर पुरावा नष्ट करण्यासाठी संदीप संकपाळ यांचा मृतदेह पाडेगाव, ता. खंडाळा गावच्या हद्दीत सर्दचा ओढाजवळ वघळीत पुरून पुरावा नष्ट करण्याच प्रयत्न करण्यात आला. याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात चाैघांवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस अधिक माहिती घेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस