ठळक मुद्देनवा फंडा : विस्मृतीतील पोस्टकार्ड स्मरणपत्र म्हणून दारात!कमी पैशांत लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्याची अनोखी शक्कल
सातारा : सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाखाली पत्र आणि पोस्टकार्ड दूरवर गेल्याचा समज आहे; पण साताऱ्यातील काही चाणाक्ष व्यापाऱ्यांनी चक्क कमी पैशांतील संपर्काचं साधन म्हणून या पोस्टकार्डचा स्मरणपत्र म्हणून उपयोग केला आहे. यामुळे संस्थेच्या नावाबरोबरच वाहनाची पीयूसी कधी संपणार, याची माहिती ग्राहकांना थेट घरात बसून मिळत आहे.मोबाईलच्या जमान्यात घरातील लँडलाईनही हळूहळू हद्दपार होऊ लागले आहेत. त्यामुळे पत्र आणि पोस्टकार्ड केवळ शासकीय कामाकाजाचेच धनी होऊ पाहत आहेत. अशा स्थितीत साताऱ्यातील काही व्यावसायिकांनी पोस्टकार्डच्याद्वारे सातारकरांशी संवाद साधण्याचा निश्चय केला. नूतनीकरणाचे स्मरण करण्यासाठी अनेक सातारकरांच्या घरात हे पोस्टकार्ड डेरेदाखल झाले आहे.