शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

सातारा : नववी पास डॉक्टरकडून गर्भलिंग तपासणी, सातारा जिल्ह्यात आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 1:10 PM

केवळ नववी पास असूनही डॉक्टरच्या थाटात गर्भवती महिलांचे गर्भलिंग निदान करणाऱ्या तरुणाला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, या आरोपीला तीन मुली असून माण-खटावच्या दुष्काळी भागात मोटारसायकलवर फिरून तो हा गोरख धंदा करायचा.

ठळक मुद्दे नववी पास डॉक्टरकडून गर्भलिंग तपासणी सातारा जिल्ह्यात आरोपीला अटकसोनोग्राफी मशीन घेऊन मोटारसायकलवर फिरता दवाखाना

सातारा : केवळ नववी पास असूनही डॉक्टरच्या थाटात गर्भवती महिलांचे गर्भलिंग निदान करणाऱ्या तरुणाला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, या आरोपीला तीन मुली असून माण-खटावच्या दुष्काळी भागात मोटारसायकलवर फिरून तो हा गोरख धंदा करायचा.याबाबत माहिती अशी की, खटाव तालुक्यातील औंध परिसरात नाथा सहदेव खाडे (वय ३१, रा. धामणी, पो. पिंपरी, ता. माण) हा मोटारसायकलीवर पाठीमागे पिवळ््या रंगाची मोठी सॅक घेऊन संशयितरित्या फिरत होता. त्याला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे यांच्या पथकाने ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सोना स्टार कंपनीचे सोनोग्राफी मशीन, मोटारसायकल (एमएच ११ सीएन ५९०६) आणि मोबाईल फोन असा एकूण २ लाख २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. गर्भलिंग निदान करण्यासाठी तो दुष्काळी भागातील गावोगावी मोटारसायकलवर मशीन घेऊन फिरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तेव्हा पोलिसांनी त्याला अटक करून मुद्देमाल ताब्यात घेतला.तो केवळ नववी पास असून त्याच्याकडे कोणतीही वैद्यकिय पदवी नाही. तरीही मशीनद्वारे गर्भवती महिलांची गर्भ लिंग निदान तपासणी करत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

या दुष्काळी भागातील एका डॉक्टरकडे काम करत असताना त्याने निदानाची तांत्रिक माहिती घेतली होती. दरम्यान, तपासणीनंतर गर्भपातासारखे प्रकार केले गेले काय, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हाpregnant womanगर्भवती महिला