सातारा : ज्या माळरानावर कोणतेच पीक येत नव्हते. त्या कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रुक, वेळूतील शेतकरी बागायत पिके घेतआहेत. ही सारी किमया पाण्याची आहे. आता या दोन्ही गावांची १०० टक्के ठिबककडे वाटचाल सुरू आहे. वर्षभरात संपूर्ण कृषी क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचा विडा या दोन्ही गावांनी उचलला आहे.जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रुक व वेळू या गावांना भेटी देऊन जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आणि वॉटर कपमधून झालेल्या कामांतून जी हिरवाई फुलली आहे, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता झाली आहे, त्याची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी कीर्ती नलवडे, तहसीलदार स्मिता पवार, सत्यमेव वॉटर कप फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, तालुका कृषी अधिकारी एस. बी. साळुंखे आदी यावेळी उपस्थित होते.या गावात पूर्वी टँकरने पाणी आणून ते विहिरीत ओतले जायचे. आता ही परिस्थिती राहिली नसून विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गावाला लागणारे पाण्याचे टँकर आता पूर्णपणे बंद होऊन लोकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली.वेळूचा तलाव जोड प्रकल्पाचे काम अतिशय चांगले झाले असून, राज्याला नव्हे तर देशाला दिशा देणारे काम झाले आहे. या सर्व कांमांचे श्रेय गावकºयांचेच आहे, असेही कौतुक त्यांनी यावेळी केले.जलसंधारणाच्या कामामुळे या गावांना आता शाश्वत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. येथील शेतकऱ्यांनी आता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. यासाठी संपूर्ण क्षेत्र हे ठिबकखाली आणा, १ वर्षाने मी तुमच्या गावात येऊन सर्वांचा सत्कार करेन, असे आश्वासनही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी यावेळी दिले.जयलुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ग्रामसेवक इंगवले व कृषी सहायक वैशाली सुतार यांचा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सत्कार केला. जिल्हाधिकाऱ्यांनी तलाव जोड प्रकल्पाची पाहणी केली. यात काय सुधारणा करता येतील? याबाबतीही अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.
सातारा : न्हावी बुद्रुक, वेळू संपूर्ण माळरान ठिबक सिंचनाखाली आणण्याचा विडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 6:02 PM
ज्या माळरानावर कोणतेच पीक येत नव्हते. त्या कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रुक, वेळूतील शेतकरी बागायत पिके घेतआहेत. ही सारी किमया पाण्याची आहे. आता या दोन्ही गावांची १०० टक्के ठिबककडे वाटचाल सुरू आहे. वर्षभरात संपूर्ण कृषी क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचा विडा या दोन्ही गावांनी उचलला आहे.
ठळक मुद्देशेतकरी घेत आहेत आता बागायती पिकेन्हावी बुद्रुक, वेळू माळरानावर संपूर्ण कृषी क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचा विडा