सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या कार हॉटेलमध्ये घुसली. यात एक ठार तर दोघेजण जखमी झाल्याची घटना वाढे फाटा परिसरात मंगळवारी पहाटे घडली. गोपाळ शिवाजी गायकवाड (वय १९ रा. सोनखेड, ता. निलंगा, जि. लातूर) असे मृताचे नाव आहे.
दरम्यान, टपरीमध्ये झोपलेले गोपाळ शिवाजी गायकवाड या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर मिथून चक्रवर्ती, अरविंद जगनाथ जाधव (रा. वाढे, ता. सातारा) जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा गुन्हा दाखल करून कार व चालकास ताब्यात घेतले.