सातारा : वॉटर कप स्पर्धेच्या तिसºया टप्प्याची तयारी सुरू असून, पुढील वर्षीही सातारा जिल्ह्याचे ‘एक पाऊल पुढे’ राहणार आहे. त्यासाठी समन्वयक जिल्ह्यातील माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यांतील गावोगावी ग्रामसभा घेत आहेत. पुढील स्पर्धेत किमान १०० च्या वरती गावांचा सहभाग राहणार आहे. वेळू, भोसरे, बिदालप्रमाणेच जिल्ह्यातील इतर गावेही राज्यात डंका वाजवतील, अशाप्रकारे नियोजन सुरू झाले आहे.गेल्या वर्षीपासून राज्यात अभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू झाली आहे. पहिल्यावर्षी या स्पर्धेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सातारा, बीड आणि अमरावती हे तीन जिल्हे या स्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये सातारा जिल्ह्यानेच अंतिम बाजी मारत प्रथम क्रमांक मिळविला होता. कोरेगाव तालुक्यातील वेळू गावाने हा क्रमांक पटकावला होता. यावर्षीच्या दुसºया स्पर्धेसाठी राज्यातील १३ जिल्हे उतरले होते. तर ३० तालुक्यांतील सुमारे १ हजार २०० हून अधिक गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.सातारा जिल्ह्याने दुसºया वर्षीही मोठ्या प्रमाणात व सक्रिय असा सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील ९६ गावे या स्पर्धेत उतरली होती. त्यामध्ये अधिक करून माण तालुक्यातील ३२ गावांचा सहभाग होता. जवळपास या सर्वच गावांमध्ये जलसंधारणाचे मोठे काम झाले आहे. यामध्ये डीपसीसीटी, ओढ्याचे रुंदीकरण व खोलीकरण, सीसीटी, वृक्षारोपणासाठी खड्डे, विहीर पुनर्भरण, माती परीक्षण, बंधारे, पाझर तलाव दुरुस्ती, गळती काढणे, नवीन नालाबांध तयार करणे आदी कामांचा समावेश होता. ४५ दिवसांच्या या कालावधीत लोकसहभाग, बाहेरील संस्था, लोकांची मदत, लोकप्रतिनिधींचे आर्थिक सहकार्य यामधून ही कामे झाली आहेत. यासाठी चाकरमान्यांनी सुटी काढून गावाला येत गावाच्या जलसंधारणाच्या कामात मोठा वाटा उचलला होता.या स्पर्धेचा अंतिम निकाल आॅगस्टमध्ये जाहीर झाला. या स्पर्धेमध्ये खटाव तालुक्यातील भोसरे गावाला दुसरा तर माण तालुक्यातील बिदाल गावाला तिसरा क्रमांक विभागून मिळाला.
सलग दुसºयावर्षीही राज्यात सातारा जिल्ह्याने डंका वाजवला. आता तिसºया वर्षीची तयारी सुरू असून, अनेक गावे त्यामध्ये समाविष्ट होणार आहेत. तिसºया टप्प्यात जिल्ह्यातील माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यांचा समावेश आहे. त्यासाठी पाणी फाउंडेशनचे समन्वयक संबंधित तालुक्यातील गावोगावी जाऊन ग्रामसभा घेत आहे. लोकांना पाण्याचे महत्त्व सांगत आहेत. यामध्ये क्रमांक एकचे पत्र पाणी फाउंडेशनचे समन्वयक घेत आहेत. आतापर्यंत तीन तालुक्यांतील ७६ ग्रामपंचायतींकडून सहभागाचे पत्र मिळाले आहे.निवडणुकीतील विरोधक गावासाठी एकत्र...वॉटर कपमधील सहभागी तालुक्यांत ग्रामसभा सुरू आहेत. या ग्रामसभेत काही दिवसांपूर्वीच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील विरोधक एकत्र येत आहेत. गावातील जलसंधारणाच्या कामासाठी सर्व गट-तट, हेवे-दावे बाजूला ठेवून त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक गावे एक झाल्याचे चित्र पाहावयास मिळू लागले आहे.स्पर्धा दि. ८ एप्रिल ते२२ मे २०१८ याकालावधीत होणारराज्यातील २२ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यांचा सहभाग राहणारस्पर्धेत सहभागघेण्याची अंतिम मुदत१० जानेवारी २०१८आतापर्यंत जिल्ह्यातून ७६ ग्रामपंचायतींचे सहभागाचे पत्रतिसºया वर्षीच्या स्पर्धेसाठी बक्षीस रकमेत वाढ