शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
2
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
3
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
4
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
5
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
6
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
7
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
9
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
10
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
11
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
13
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
14
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
15
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
16
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
17
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
19
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?

सातारा, फलटणला लावणी उत्सव

By admin | Published: February 04, 2015 10:31 PM

सखींसाठी नजराणा : चैत्रालीराजे यांचा बहारदार कार्यक्रम

सातारा : ‘लोकमत सखी मंच २०१५’ ची विक्रमी सदस्य नोंदणी झाली. या सदस्यांसाठी नवीन वर्षातील धमाकेदार नजराणा म्हणजेच ‘लावणी महोत्सव’ येत्या शनिवार, रविवार घेऊन येत आहोत. शनिवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी फलटण येथील राजलक्ष्मी लॉन्समध्ये दुपारी २ वाजता प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा चैत्रालीराजे यांच्या लावणी महोत्सवाचे आयोजन केले आहे. तर सातारा येथील सदस्यांसाठी हाच लावणी शो रविवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, जिल्हा परिषदजवळ, सातारा येथे आयोजित केला आहे. नेहमीप्रमाणे या कार्यक्रमातही लकी ड्रॉमधून आकर्षक बक्षिसे सखींना जिंकता येणार आहेत. साताऱ्याच्या सखींसाठी कास हॉलिडेज, रिसॉर्टमध्ये एक भाग्यवान सखीला परिवारातील तीन व्यक्तींसोबत एक दिवस मोफत वास्तव्य करता येणार आहे. तीन भाग्यवान सखींना आनंद कृषी पर्यटन केंद्राची शिवार सहल मोफत मिळणार आहे. दोन भाग्यवान सखींना एस.एस. एंटरप्रायजेस तर्फे दोन इस्त्री मिळणार आहेत. तर दहा भाग्यवान सखींना सुर्वेज्मध्ये मोफत जेवण मिळणार आहे. याबरोबरच पाच भाग्यवान सखींना इंपे्रशन ब्युटी पार्लरमध्ये मोफत फेशियल मिळणार आहे. याशिवाय एका भाग्यवान सखीला १८ हजार पाचशे रुपये किमतीची आटाचक्की अनंत ट्रेडिंग यांच्या मार्फत आणि २१ हजार रुपये किमतीचा सोफासेट माउली सोफाज् यांच्याकडून मोफत मिळणार आहे. यावर्षातील सर्व सभासदांना सुमुखी ब्युटीपार्लर यांच्यामार्फत २५० रुपयांचे फेस क्लिनअप मोफत मिळणार आहे. फलटण येथील सखींना कास हॉलिडेज आणि आनंद कृषी पर्यटन केंद्राची सुविधा लकी ड्रॉ मधून मिळणार आहे. शिवाय लक्ष्मी ब्युटी पार्लर यांच्याकडून प्रत्येक सखीला हेअर कट मोफत आणि दोन भाग्यवान सखींना १००० रुपयांचे हेअर स्पा मोफत मिळणार आहे. हॉटेल विसावा आणि हॉटेल रघुनंदनमार्फत वाढदिवसानिमित्त मोफत जेवण मिळणार आहे. मात्र, याकरिता वाढदिवसापासून तीन दिवसांच्या आत या सुविधेचा लाभ घेणे आणि सोबत वाढदिवसाचा पुरावा घेऊन येणे बंधनकारक आहे. जान्हवी ब्युटीपार्लर मार्फत दरमहा दहा सखींना फेशियल, सोनाज ब्युटी पार्लरकडून प्रत्येक सखीला मोफत फेस क्लिनअप आणि आयब्रो आणि सखी साडी सेंटरमध्ये पाचशे रुपयांच्या खरेदीवर दोनशे रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. लकी ड्रॉसाठी आवश्यक असणारे कूपन उद्याच्या अंकात प्रसिद्ध केले जाईल. (प्रतिनिधी)या कार्यक्रमासाठी २०१५ चे सखी मंचचे ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. तसेच कार्यक्रमस्थळी सभासद नोंदणी केली जाणार नाही, याची सखींनी नोंद घ्यावी. सहा वर्षांवरील मुलांना प्रवेश दिला जाणार नाही.