शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
4
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
5
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
6
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
7
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
8
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
9
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
10
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
11
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
12
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
13
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
14
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
15
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
16
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
17
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
18
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा
19
Suraj Chavan : गुलीगत फेम सूरज चव्हाणला मिळणार मैत्रीण... फळ्यावर हार्ट इमोजी, त्यात कोरलंय S; 'ती' कोण?
20
भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते -बच्चू कडू

बंगळुरूमध्ये ट्रॅफिक जाम करून सातारा पोलिसांनी सराईत आरोपीला पकडले, पाच वर्षांपासून फरार

By दत्ता यादव | Published: July 15, 2024 3:37 PM

ओळख लपविण्यासाठी पेहराव बदलला, फसवणूक प्रकरणात एका महिलेसह चौघांना अटक

सातारा : सराईत आरोपीला पकडण्यासाठी सातारा पोलिसांनी बंगळुरूमध्ये जाऊन अनोखा ट्रॅप लावला. महामार्गावरून कारने जाणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी चक्क सातारा पोलिसांनी मुद्दामहून ट्रॅफिक जाम केले. त्यामुळे सराईत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला. त्याच्या चाैकशीतून पुढे आणखी तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.विनायक शंकर रामुगडे (वय ४४, रा. ओगलेवाडी, ता. कऱ्हाड), कलावती ऊर्फ प्रिया रामचंद्र चव्हाण (४३, मूळ रा. कोरेगाव, सध्या रा. शाहूनगर, गोडोली, सातारा) तसेच या दोघांना मदत करणाऱ्या अनुजा मंगेश जाधव (२६, रा. चंदननगर, कोडोली), कुणाला अमर भांडे (२४, रा. शाहूनगर, गोडोली, सातारा), अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी करण्यात आली असून तेथील वाईन शाॅप, देशी दारूचे लायसन्स हे मंत्रालयातील अधिकारी यांच्या ओळखीने इतर ठिकाणी ट्रान्सफर करून देतो, असे सांगून विनायक रामुगडे याने प्रिया चव्हाण हिच्या मदतीने साताऱ्यातील एका व्यावसायिकाला ७५ लाखांचा गंडा घातला होता. एवढेच नव्हे तर कोरेगाव, पुणे, मुंबईसह परराज्यांतही अशाच पद्धतीने या बंटी-बबलीने अनेकांना कोट्यवधींना फसविल्याचे समोर आले. सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे पथक त्यांचा शोध घेत होते. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.तो कधी हैदराबाद, आंध्र प्रदेश तर कधी बंगळुरू येथे वावरत होता. याची माहिती डीबी पथकाला मिळाली. पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, अविनाश गवळी, हवालदार नीलेश यादव, सुजित भोसले, नीलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, इरफान मुलाणी यांचे पथक बंगळुरूला गेले. तेथे रामुगडे याचा पोलिसांनी चार दिवस कसून शोध घेतला. तेव्हा तो कारने जाणार असल्याचे पोलिसांना समजले. यानंतर पोलिसांनी तत्काळ प्लॅन तयार करून एका ठिकाणी महामार्गावर ट्रॅफिक जाम केले. त्याच्या वाहनाच्या मागे व पुढे पोलिसांनी खासगी वाहने लावून अखेर त्याला पकडून ताब्यात घेतले. त्याला साताऱ्यात आणल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चाैकशी केली. त्यावेळी त्याच्यासोबत काम करणारी प्रिया चव्हाण ही पुण्यात असल्याचे पोलिसांना समजले. एका पथकाने पुण्यात जाऊन प्रिया चव्हाण हिला अटक केली. या बंटी-बबलीला मदत करणारे अनुजा जाधव आणि कुणाला भांडे या दोघांनाही पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली. ही थरारक कारवाई तडीस नेल्याने पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी डीबी पथकाचे काैतुक केले.    

ओळख लपविण्यासाठी पेहराव बदलला..आरोपी विनायक रामुगडे हा पोलिसांना चकवा देण्यासाठी नाव बदलून, बनावट ओळखपत्र वापरायचा. वेगवेगळ्या प्रकारची दाढी ठेवायचा. तसेच केसांचा विग वापरून तो ओळख लपवायाचा. दुसऱ्या वाहनांचे नंबर त्याच्या कारला लावायचा. सीमकार्ड काही कालावधीसाठी वापरून पुन्हा फेकून द्यायचा. सध्या या बंटी-बबलीकडून १० मोबाइल, बरीच सीमकार्ड, केसांचा विग पोलिसांनी जप्त केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसKarnatakकर्नाटक