सातारा : सांगली येथे झालेल्या ४७ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत सातारा जिल्हा पोलीस दलाने आपला वेगळा ठसा उमटविला. या स्पर्धेत सातारा पोलीस दलातील महिला व पुरुष खेळाडूंनी २६ गोल्ड, ३० सिल्वर, २० ब्रॉन्झ अशी एकूण वैयक्तिक ७६ पदके मिळवून उल्लेखनिय कामगिरी केली.पोलीस दलामध्ये कर्तव्य बजावत असताना ताण तणावांना पोलिसांना सामोरे जावे लागते. या हेतूने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये संघभावना निर्माण व्हावी, तसेच गुणवत्ता व सुप्त गुणांमध्ये वाढ व्हावी, या हेतूने या क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण या जिल्ह्यांतील खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते.सातारा जिल्हा पोलीस दलातील १८० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अॅथेलेटिक्स, क्रॉस कंन्ट्री, व्हॉलीबॉल, बॉक्सींग, जलतरण, महिला वेटलिप्टींग या क्रीडा प्रकारात सातारा जिल्हा पोलीस दलाने विजेतेपद पटकावले. तसेच फुटबॉल, हॉकी, हॅन्डबॉल, बास्केटबॉल, खो-खो कबड्डी, पुरुष क्रॉस कन्ट्री, कुस्ती, महिला कबड्डी, ज्युदो या क्रीडा प्रकारात उपविजेतेपद पटकावले. तसेच तृतीय स्थानामध्ये हॉकी (पुरुष), खो खो (महिला), कुस्ती, ज्युदो (पुरुष) अशी विजेतेपद पटकावून उल्लेखनिय कामगिरी केली. २०१५ नंतर आत्तापर्यंत सातारा जिल्हा पोलीस दलाने जनरल चॅम्पीयनशीप मिळवून कायम आपला दबदबा ठेवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे.पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी राष्ट्रीय प्रशिक्षक विजय गायकवाड यांना खेळाडूंसाठी शिबीर आयोजित करून दिले. फिजिओथॅरॅपिस्ट डॉ. देवयानी मोघे या दरराजे फिटनेस व दुखापतीच्या अनुषंगाने मार्गदर्शन तसेच खेळाडूंच्या दैनंदिन आहारामध्ये प्रोटीन्सयुक्त डायट, आहाराबाबत मार्गदर्शन करत आहेत.विजेत्या खेळाडूंचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे, राखीव पोलीस निरीक्षक अंकूश यादव, स्पोर्ट इन्चार्ज शशिकांत गोळे, शिवाजी जाधव आदींनी कौतुक केले.
सातारा पोलिसांची पाच जिल्ह्यांत बाजी, वैयक्तिक ७६ पदके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 12:16 PM
सांगली येथे झालेल्या ४७ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत सातारा जिल्हा पोलीस दलाने आपला वेगळा ठसा उमटविला. या स्पर्धेत सातारा पोलीस दलातील महिला व पुरुष खेळाडूंनी २६ गोल्ड, ३० सिल्वर, २० ब्रॉन्झ अशी एकूण वैयक्तिक ७६ पदके मिळवून उल्लेखनिय कामगिरी केली.
ठळक मुद्दे सातारा पोलिसांची पाच जिल्ह्यांत बाजी, वैयक्तिक ७६ पदके कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत उमटविला ठसा