शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
2
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
3
आज अजित पवारांच्या स्टेजवर जाणार; काँग्रेसच्या निलंबनानंतर आमदार सुलभा खोडकेंची घोषणा
4
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
5
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
6
कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन
7
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
8
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
9
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
10
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
11
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
12
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
13
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
14
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
15
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
16
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
17
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
18
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
19
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट

पश्चिम महाराष्ट्रात मंत्री घटल्यामुळे सातारा पोलिसांची बडदास्त वाचली!

By admin | Published: March 08, 2017 11:26 PM

पूर्वी दहा तर आता चार मंत्री : तपासासाठी पोलिसांना मिळाला भरपूर वेळ

सातारा : जिल्ह्याच्या वेशीवर येणाऱ्या मंत्र्यांच्या बडदास्तीसाठी पोलिसांना नेहमीच सज्ज राहावे लागते. आघाडी शासनाच्या काळात दक्षिण महाराष्ट्रातील मंत्र्यांची संख्या जवळपास दहा होती. त्यात खुद्द मुख्यमंत्रीच सातारा जिल्ह्यातील होते. त्यामुळे पोलिसांना आणखीनच सतर्क राहावे लागत होते. मात्र, सध्या युतीच्या शासनाच्या काळात सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांचे मंत्री मिळून इन मीन चार असल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.लोकप्रतिनिधींची शासकीय बडदास्त ठेवणे, हा प्रोटोकॉल असल्यामुळे मंत्र्यांनी जिल्ह्याच्या वेशीवर प्रवेश करताच त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांना ताफा सज्ज ठेवावा लागतो. आजपर्यंत जिल्हा पोलिसांचे संख्याबळ कमी असतानाही पोलिसांनी मंत्र्यांची चोख बडदास्त ठेवली आहे. परंतु आघाडी शासनाच्या काळात खुद्द सातारा जिल्ह्यातील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असल्यामुळे पोलिसांनाही कायम सतर्क राहावे लागत होते. याशिवाय त्यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शशिकांत शिंदे, गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर या मंत्र्यांचा दौरा तसेच त्यांचा जाण्याचा मार्ग सातारा जिल्ह्याच्या वेशीतूनच असायचा. त्यामुळे पोलिसांची पळताभुई थोडी व्हायची. तब्बल दहा मंत्र्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांना सतर्क राहावे लागत होते. मंत्र्यांच्या नेहमीच्या दौऱ्यांनी पोलिसांवरील तणावात भर पडत होती.जिल्ह्याच्या वेशीचे एक टोक शिरवळजवळ तर दुसरे टोक कऱ्हाड तालुक्यापर्यंत असल्यामुळे पोलिसांना तब्बल १२९ किलोमीटर पर्यंतच्या या लांबलचक मार्गावर नेहमी सतर्क राहावे लागत होते. त्यासाठी पोलिसांना केवळ मंत्र्यांच्या बडदास्तीसाठी ‘सतर्क पथकाची’ स्थापना करावी लागली होती. वीस कर्मचारी, पाच वाहनांच्या या पथकातील कुमक लोकप्रतिनिधी जिल्ह्याच्या वेशीवर असेपर्यंत त्यांच्यासोबत कायम राहत असे.मात्र, सध्या युती शासनामध्ये केवळ चार मंत्री आहेत. त्यामुळे पोलिसांवर फारसा ताण पडत नाही. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे चार मंत्री अधूनमधून जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतात. पालकमंत्री तर नियोजन समितीच्या बैठकीशिवाय फिरकतही नाहीत. त्यामुळे पोलिसांना युती शासन विना कटकटीचे वाटत असल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)