शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
2
टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
3
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
4
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
5
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
6
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
7
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
8
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
9
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
10
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
11
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
12
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
13
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
14
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
15
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
16
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
17
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
18
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
19
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
20
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी

Satara: पुसेसावळीची दंगल अन् समाजभान

By दीपक शिंदे | Published: September 23, 2023 12:41 PM

दीपक शिंदे, मुख्य उपसंपादक, सातारा आक्षेपार्ह पोस्टच्या कारणावरून पुसेसावळीत दंगल उसळली. त्यात एका निरपराध्याचा बळी गेला. अनेकजण जखमी होऊन ...

दीपक शिंदे, मुख्य उपसंपादक, साताराआक्षेपार्ह पोस्टच्या कारणावरून पुसेसावळीत दंगल उसळली. त्यात एका निरपराध्याचा बळी गेला. अनेकजण जखमी होऊन जायबंदी झाले. घरांची तोडफोड आणि वाहनांची जाळपोळ झाली. पुसेसावळीतील घटनेचे पडसाद जिल्हा आणि राज्यभर उमटले. पण, ही दंगल राजकारण्यांनी फारशी गांभीर्याने घेतलीच नाही असे जाणवले. दंगलीनंतर आठ दिवस कोणी पुसेसावळीकडे फिरकलेच नाही. जसे काही होतेय ते होऊ दे, आपल्याला काय त्याचे, अशा प्रकारची भावना दिसली. पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी मात्र, रोज त्या परिसरात जाऊन शांततेचे आवाहन करत होते. समाजातील संपत चाललेल्या माणुसकीचा हा दृश्य परिणाम तर नाही ना, असे वाटू लागले आहे.माणसा-माणसांमध्ये प्रेमभाव वाढावा यासाठी जातीव्यवस्था संपवून सर्व समाज एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. जातीव्यवस्था आता फार लोकांच्या मनात राहिलेली नाही. पण, काहींच्या डोक्यात आहे. त्यातूनच अनेकांची डोकी फिरवण्याचे काम काही महाभाग करत आहेत. विसरत चाललेले जात आणि धर्माचे मायाजाल पुन्हा टाकण्याचा काहींचा प्रयत्न यशस्वी होऊ लागला आहे. एखाद्याला लक्ष्य करुन त्याचा बीमोड करण्याची भावना वाढू लागली आहे. आतापर्यंत सुपारी देऊन आणि शस्त्रांच्या सहाय्याने एकमेकांवर हल्ले केले जात होते.

पण, आता सुपारी दिली जाते पण, ती सोशल माध्यमांची सुपारी असते. मोबाइल हे माध्यम आणि सोशल मीडिया हा त्यातील शस्त्र झाला आहे. या शस्त्राचा चुकीच्या पद्धतीने वापर करुन एकमेकांवर हल्ले करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होत आहे. डोकी भडकवून जीवघेण्या इतपत भावना भडकविल्या जात आहेत. त्या थांबविण्यासाठी राज्यातील सत्ताधारीही कमी पडत आहेत.एखाद्या ठिकाणी दंगल उसळल्यानंतर तिथल्या लोकप्रतिनिधीने ताबडतोब उपस्थित राहून लोकांना आवाहन करण्याची आवश्यकता होती. पण, पुसेसावळी ज्या मतदारसंघात येते त्या मतदारसंघाचे आमदार दहा दिवसांनंतर मतदारसंघात गेले. पालकमंत्र्यांचीही तीच अवस्था. केवळ खासदार उदयनराजे भोसले यांच्यासारखा खासदार दंगल झाल्यानंतर काही तासांतच पुसेसावळीत पोहोचून लोकांना शांततेचे आवाहन करुन आले. इतरांमध्ये तेवढे धाडस नव्हते का?

का होत असलेल्या प्रकाराशी काही देणेघेणेच नव्हते. दंगलीत ज्यांच्या घरांचे नुकसान झाले, ज्यांच्या गाड्या जाळल्या गेल्या त्यांना किती नुकसानभरपाई मिळाली? त्यांना कोणी दिलासा दिला का? दंगलीत काही झाले तरी चालते का? ज्या निरपराध युवकाचा बळी गेला त्याच्या कुटुंबीयांना कोणी मदत केली का ? अजून तरी कोणी मदत केल्याचे ऐकिवात नाही. कोणी कशाला सरकारनेही अजून किती मदत देणार हे जाहीर केलेले नाही. देणार की नाही हे सुद्धा स्पष्ट नाही. एवढी अनास्था दाखविल्यानंतर कुटुंबीयांनी न्यायाची काय अपेक्षा करायची.अनास्थेच्या या प्रकारात काही सामाजिक संघटना आक्रमक झाल्या. पण, त्यांनीही मोर्चासारखे हत्यार उगारायचे ठरविले. त्यातून पुन्हा ताणतणाव अधिकच वाढणार म्हटल्यावर त्यांच्यावरही बंदी आणली. पण, खऱ्या अर्थाने दंगलीच्या घटनेवर जर उपाय करायचा असेल तर त्यातील दंगलग्रस्तांना मदत करण्याची आवश्यकता आहे. जी कोणीही आतापर्यंत केली नाही. केवळ शाब्दिक आश्वासनावर विसंबून चूल चालणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या स्तरातून मदतीची गरज आहे. तरच त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी सहकार्य होईल.

कोणतीही गोष्टी पुढे पाठविण्यापूर्वी करा विचार ( थिंक )आपल्या हातात असलेल्या मोबाइलवर शेकडो गोष्टी येत असतात. त्यातली आपण काही पाहतो, काही पाहत नाही आणि काही पाहून पुढे पाठवितो. पुढे पाठविताना काही गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे. आपण पुढे पाठवत असलेली गोष्ट खरी आहे का, त्यात सत्यता किती आहे, दुसरी गोष्ट समाजासाठी हानिकारक तर नाही ना ? तिसरी बाब त्यातून आपण कोणती माहिती प्रसारित करीत आहोत ? चौथी बाब त्यातून नकारात्मक भावना तर समाजात पसरणार नाहीत ना आणि पाचवी बाब त्यातून आपण पाठवत असलेल्या व्यक्तीला किंवा समाजाला काही चांगले ज्ञान मिळेल का ? या सर्वांचा विचार करा आणि मगच एखादी पोस्ट पुढे पाठवा.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर