सातारा : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ साताऱ्यात बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. कोरेगाव-भीमा हिंसाचार सहभागाचा ठपका ठेवत संभाजी भिडेगुरुजी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, संभाजी भिडे यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही, असा दावा करत शिवप्रतिष्ठानने साताऱ्यात भव्य मोर्चा काढला.राजवाड्यावरील गांधी मैदानापासून दुपारी बारा वाजता मोर्चास प्रारंभ झाला. या मोर्चामध्ये युवक-युवतींसह पाच हजारांहून अधिक धारकरी सहभागी झाले होते. भिडे गुरुजींवर दाखल असलेले गुन्हे खोटे असून, ते मागे घ्यावेत, अशा घोषणा देत धारकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राहावा म्हणून जिल्हा पोलीस दलातर्फे मोर्चाच्या दोन्ही बाजूंनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर या मोर्चाचे सभेमध्ये रुपांतर झाले. जातीपातीचे राजकारण केले जात असून, विनाकारण भिडेगुरुजींना खोट्या केसमध्ये गोवण्यात आल्याचा आरोपही यावेळी धारकऱ्यानी केला. धारकऱ्याच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्याना निवेदन देऊन या पाठीमागे राजकारण करणाºया सूत्रधारावर कारवाई करावी, अशी मागणीही केली.
सातारा : संभाजी भिडे समर्थकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 2:48 PM
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ साताऱ्यात बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
ठळक मुद्देसंभाजी भिडे समर्थकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाकडेकोट पोलीस बंदोबस्त : पाच हजारांहून अधिक धारकरी सहभागी