सातारा : शेतात जायला रस्ता मिळत नाही, आणि महसूल विभागही मागणीची दखल घेत नाही, या कात्रीत सापडलेल्या सातारा तालुक्यातील तारगावच्या शेतकऱ्याने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातच विषारी औषध पिले. सुनील संपत मोरे (वय ३५) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.मोरे यांना शेतातून जाण्यासाठी रस्ता नव्हता. कोरेगाव तहसीलदार कार्यालयाकडे त्यांनी रस्ता मिळण्यासाठी मागणी केली. या मागणीसाठी तहसील कार्यालयात अनेकदा खेटे मारले, मात्र त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही. याच संदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी सुरु होती.आपल्याला न्याय मिळेल का? या विवंचनेत असणाऱ्या सुनील मोरे यांनी या कार्यालयाच्या आवारातच विष घेतले. महसूल विभागातील वाहनचालक व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात नेण्याच्या हालचाली सुरु आहेत.
सातारा : महसूल विभाग दखल घेत नसल्याने शेतकऱ्याचे विष प्राशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 4:44 PM
शेतात जायला रस्ता मिळत नाही, आणि महसूल विभागही मागणीची दखल घेत नाही, या कात्रीत सापडलेल्या सातारा तालुक्यातील तारगावच्या शेतकऱ्याने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातच विषारी औषध पिले. सुनील संपत मोरे (वय ३५) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
ठळक मुद्देमहसूल विभाग दखल घेत नसल्याने शेतकऱ्याचे विष प्राशन