शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

डोली, कार नाही, तर नवरी आली चक्क रिक्षातून लग्नमंडपात; रिक्षाचालक बापाच्या कष्टाला अनोखा सलाम

By दीपक शिंदे | Published: November 29, 2023 7:06 PM

साताऱ्यातील रिक्षाचालकाच्या लेकीचं लग्न सर्वत्र चर्चेचाच विषय

सातारा : लेकीचं लग्न जोशात करायचं असा प्रत्येक बापाचा हेका असतो. कर्ज काढावं लागलं तरी चालेल पण चारचौघात लग्न एकदम झोकात झालं पाहिजे अशी अपेक्षा असते. असंच झोकात लग्न करण्याचा निर्णय घेतलेल्या बापाला मुलीचा हट्टही पुरवावा लागला. लग्नाला जाणार तर रिक्षातूनच असा हट्ट तिने केला आणि वडिलांनी एक ना दोन तब्बल २० रिक्षा दारात आणून उभ्या केल्या. सर्व वऱ्हाडी मंडळी रिक्षातूनच लग्नमंडपात दाखल झाली. त्यामुळे हे लग्न सर्वत्र चर्चेचाच विषय ठरले.सातारा शहराजवळील गोडोलीमधील राजेवाडी येथील विजय खामकर हे रिक्षा चालवतात. रिक्षा चालवून त्यांनी आपला संसार केला. त्यांची लेक सायली खामकर हिचा विवाह सांगवड (ता. पाटण) येथील शुभम पाटील यांच्याशी सोमवारी ( दि. २७ ) रोजी झाला. तिच्या लग्नासाठी आलेली वऱ्हाडी मंडळी ही रिक्षातूनच आली आणि हा लग्नसोहळा लक्षवेधक ठरला.रिक्षा चालवून कुटुंब चालवणाऱ्या वडिलांच्या कष्टाला अनोख्या पद्धतीनं सायली खामकर हिनं सलाम केला आहे. सायलीनं तिच्या लग्नाचं वऱ्हाडही रिक्षातून नेण्यासाठी हट्ट धरला. वडिलांनी देखील लेकीचा हट्ट पूर्ण करण्याचा संकल्प केला आणि तो पार पाडला. यासाठी त्यांना देगाव येथील पाटेश्वर रिक्षा संघटनेची मदत झाली. या संघटनेतील रिक्षाचालकांनी आपापल्या रिक्षा लग्नानिमित्त सजवून वऱ्हाडी मंडळींच्या प्रवासासाठी सज्ज ठेवल्या. राजेवाडी ते सातारा येथील मंगल कार्यालयापर्यंत वऱ्हाडी मंडळी रिक्षातून दाखल झाली.राजेवाडीतील बहूतेक जण रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात. विजय खामकर हे व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. त्यांची कन्या सायली हिनं रिक्षा व्यवसायातून कुटुंबाला स्थैर्य, सुबत्ता लाभली. या भावनेतूनच लग्नाला येणारी वऱ्हाडी मंडळी रिक्षातून न्यायचा आग्रह धरला. यातून तिने आपल्या वडिलांच्या कष्टाला अनोख्या पद्धतीने सलाम केला. सायली खामकर हिच्या लग्नासाठी १५ ते २० रिक्षांतून ही वऱ्हाडी मंडळी साताऱ्यातील मंगल कार्यालयात दाखल होताना पाहायला मिळाली.

सायली खामकरचा धाडसी निर्णयसायली खामकर ही पदवीधर आहे. लग्नासाठी आपण दुसऱ्या कोणत्याही गाडीने न जाता स्वतःचा वडिलांच्या रिक्षामधून जावं हा क्षण सर्वांसाठी आनंदाचा आणि गर्वाचा होता. आपल्या वडिलांनी आयुष्यभर केलेल्या कष्टामुळे आपण इथवर पोहचलो याची जाणीव ठेवत तिने हा निर्णय घेतला. तिच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmarriageलग्न