शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
4
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
5
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
6
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
7
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
8
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
10
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
11
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
12
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
13
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
14
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
15
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
16
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
17
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
18
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
19
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
20
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र

सातारा : कास पठारकडे जाणारा रस्ता खचला, अनिश्चित काळापर्यंत मार्ग बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2017 8:38 AM

कास पठारकडे जाणारा रस्ता खचल्याची माहिती समोर आली आहे. यवतेश्वर घाटातील रस्ता खटला आहे.

सातारा : कास पठारकडे जाणारा रस्ता खचला आहे. यवतेश्वर घाटातील हा रस्ता खटला आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी घाटातून जाणारी वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सोमवारी पहाटे हा रस्ता खचल्यामुळे अनिश्चित काळापर्यंत हा मार्ग बंद करण्यात आला आहे. केवळ पठारावर राहणाऱ्या स्थानिक बाईकस्वारांना वगळता कोणत्याही वाहनचालकाला यापुढे 'कास'कडे प्रवेश दिला जाणार नाही. दरम्यान सुटीनिमित्त कास पठारावर रविवारी मुक्कामाला गेलेल्या पर्यटकांना एकीव -कुसुंबी-मेढामार्गे पुढील मार्गासाठी सोडण्यात येत आहे.

शनिवार रविवारला जोडून गांधी जयंती दिनाची सुट्टी आल्यामुळे हजारो पर्यटक सध्या कास पठारावर आहेत. पुण्या-मुंबईकडूनही हजारो पर्यटक साताऱ्याहून 'कास'कडे निघाले होते. मात्र सोमवारी पहाटे यवतेश्वर घाटातील रस्ता खचला. घटनेचे गांभीर्य ओळखून सार्वजनिक बांधकाम खाते, पोलीस खाते आणि वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी हजर झाले. खचलेला घाट अत्यंत अरुंद असल्यामुळे या ठिकाणची वाहतूक बंद करण्याचा निर्णय तत्काळ घेण्यात आला. तसेच खचलेल्या भागाजवळ डोंगराची भिंत जेसीबीने खणून काढून रस्ता अधिक रुंद करण्याची मोहीम हाती घेण्यात आली.

कासकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या सातारा शहरातील समर्थ मंदिर चौकातच अडवण्यात आल्या. सकाळपासून शेकडो गाड्या पुन्हा माघारी पाठवण्यात आल्या. मात्र, दूर दूरवरून आलेल्या पर्यटकांनी 'बोगदा'मार्गे ठोसेघर किंवा सज्जनगडकडे जाण्याचा निर्णय घेतला. 

'लोकमत'नं दिला होता वेळोवेळी धोक्याचा इशारा !यवतेश्वर घाटातील अनेक कठडे ढासळल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही क्षणी धोका होऊ शकतो, याची जाणीव 'लोकमत'मधून वेळोवेळी करून  देण्यात आली होती. मात्र ढासळलेल्या कठड्यांच्या जागी केवळ पांढरा रंग लावलेले दगड लावून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला गेला. कासला 'हेरिटेज'चा दर्जा प्राप्त झाल्यापासून लाखो पर्यटकांची पावले इकडे वळाली आहेत. या पार्श्वभूमीवर हा रस्ता अधिकाधिक रुंद अन् चांगला करण्याची गरज आहे.