शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

सातारा : एस वळणावर अपघाताची मालिका सुरूच, ट्रक उलटून चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 2:30 PM

खंबाटकी घाटातील एस वळणावर झालेल्या अपघातात गेल्या महिन्यात १८ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या एस वळणावर अपघाताची मालिका अद्यापही सुरूच असून, मंगळवारी दुपारी सिमेंट वाहतूक करणारा ट्रक याच वळणावर उलटला. यामध्ये चालक जागीच ठार झाला.

ठळक मुद्देएस वळणावर अपघाताची मालिका सुरूच, ट्रक उलटून चालक ठारआता तरी प्रशासनाला जाग येणार का? नागरिकांतून संतप्त सवाल

खंडाळा : खंबाटकी घाटातील एस वळणावर झालेल्या अपघातात गेल्या महिन्यात १८ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या एस वळणावर अपघाताची मालिका अद्यापही सुरूच असून, मंगळवारी दुपारी सिमेंट वाहतूक करणारा ट्रक याच वळणावर उलटला. यामध्ये चालक जागीच ठार झाला.याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटात भरधाव वेगात ट्रक एस वळणावर उलटला. या अपघातात चालक जागीच ठार झाला असून चौघे जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.

मृत चालकाला ट्रकच्या केबीनमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न पोलिसांचे सुरू होते. खंडाळा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना खंडाळ्यातील ग्रामीण रुग्णालयात पाठविले.दरम्यान, गेल्या महिन्यात खंबाटकी बोगद्यातील या एस वळणावर टेम्पो उलटून कर्नाटकातील १८ प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. या अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने केवळ महामार्गावर पट्टे ओढून एस वळणाची डागडूजी केली होती. मात्र, त्यानंतरही या ठिकाणी दोन अपघात झाले. मंगळवारी दुपारी या ठिकाणी झालेला तिसरा अपघात असून, जिल्हा प्रशासनाला आता तरी जाग येईल का? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात