शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

सातारा : लोकमतचा आदर करत लाडका पक्षी साताऱ्यांतच, शांतिदुताचा पुतळा परेड मैदानात बसवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 1:00 PM

सातारा जिल्हा पोलिस मुख्यालयासमोरील शांतिदूत पक्ष्याचा पुतळा उखडून काढून कोल्हापूरला हलविण्याचा घाट घातला गेला होता. यासंदर्भात लोकमतने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध करताच हा पुतळा साताऱ्यांतच ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. सातारकरांच्या लोकमतचा आदर करत पोलिस परेड मैदानात हा पक्षी बसविण्यात येणार आहे. साताऱ्यात कोठेही बसवा, मात्र शहराबाहेर हलवू नका, अशी स्पष्ट भूमिका लोकमतमधून मांडण्यात आली होती.

ठळक मुद्देपोलिस प्रशासनाचा अखेर निर्णयशांतिदुताचा पुतळा परेड मैदानात बसवणार

सातारा : जिल्हा पोलिस मुख्यालयासमोरील शांतिदूत पक्ष्याचा पुतळा उखडून काढून कोल्हापूरला हलविण्याचा घाट घातला गेला होता. यासंदर्भात लोकमतने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध करताच हा पुतळा साताऱ्यांतच ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. सातारकरांच्या लोकमतचा आदर करत पोलिस परेड मैदानात हा पक्षी बसविण्यात येणार आहे. साताऱ्यात कोठेही बसवा, मात्र शहराबाहेर हलवू नका, अशी स्पष्ट भूमिका लोकमतमधून मांडण्यात आली होती.शतकोत्तर पोलिस मुख्यालयासमोरील असलेला शांतिदूत पक्ष्याचा पुतळा १७ वर्षांपूर्वी बसविला होता. ऐतिहासिक इमारतीसमोर असलेला हा पुतळा जाता-येता प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत होता. या पुतळ्याशी बहुतांश सातारकरांचं भावनिक नातं जोडलं गेलं होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांच्या इच्छेखातर हा पुतळा कोल्हापूरला हलविण्याचा घाट प्रशासनाने घातला.

दरम्यान, गुरुवारी रात्री शांतिदूत पक्ष्याचा पुतळा उखडण्याची धक्कादायक मोहीम आकस्मिकपणे सुरू केली गेली.पुतळा उखडण्यात येत असल्याचे पाहून शेकडो सातारकांनी या विरोधात आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. गुरुवारी रात्री उशिरा सुशांत मोरे, रवींद्र कांबळे आणि प्रशांत जगताप या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन करत काम थांबवले. पुतळा हलवायचाच असले तर साताऱ्यांतच कुठेही बसवा, मात्र केवळ एका अधिकाऱ्यांच्या इच्छेखातर कोल्हापुरात न्यायची गरज आहे का? अशा तीव्र भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcultureसांस्कृतिक