शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

भीषण आगीत सातारा-सोलापूर एस.टी.बस जळून खाक, धुळदेवजवळ दुर्घटना; अन् ४४ प्रवाशांचे जीव वाचले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2022 7:09 PM

या घटनेमुळे सातारा-पंढरपूर मार्गावरील वाहतूक अर्धा तास बंद

म्हसवड : अचानक लागलेल्या आगीत सातारा आगाराची सोलापूर-सातारा एसटी बस जळून खाक झाली. म्हसवड येथून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या धुळदेव या ठिकाणी या एसटी बसच्या इंजिनमधून धूर येण्यास सुरुवात झाली. एसटीने अचानक पेट घेतल्याने एसटीचे मोठे नुकसान झाले. धूर येत असल्याचे लक्षात येतात चालक, वाहकानी प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाशांना खाली उतरुन सुरक्षित ठिकाणी हलविले. यामुळे ४४ प्रवाशांचे जीव वाचले.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सातारा आगारातून शनिवारी सकाळी निघालेली सातारा-सोलापूर एसटी (एमएच ११ बीएल ९३५५) सोलापूरच्या दिशेने प्रवासी घेऊन रवाना झाली होती. बस म्हसवड बसस्थानकात येऊन येथे काही प्रवासी उतरले व त्यानंतर पुढील प्रवासास बस निघाली.म्हसवडपासून पंढरपूरच्या दिशेला पाच किमी अंतरावर धुळदेव येथे दुपारी पावणे दोनच्या सुमारास आली असता एसटीच्या इंजिनमधून अचानक धूर यायला लागला. त्यानंतर बसने अचानक पेट घेतला. क्षणातच संपूर्ण एसटीने पेट घेतल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली.ही बाब लक्षात येताच वाहक व चालकानी प्रसंगसावधान दाखवत एसटी रस्त्याच्या बाजूला उभी केली. त्यानंतर आतमील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. यामुळे कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. बसला आग लागल्याची माहिती स्थानिकांनी म्हसवड पालिकेला कळवताच तत्काळ म्हसवड पालिकेच्या आग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला.आग आटोक्यात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे सातारा-पंढरपूर मार्गावरील वाहतूक अर्धा तास बंद होती. त्यामुळे पुढे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा काहीकाळ खोळंबा झाला होता. या घटनेची म्हसवड पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातSatara areaसातारा परिसरfireआग