जिंती : फलटण तालुक्यातील शिंदेवाडी येथील अठरा फाटा हे गाव दहा दिवसांपासून अंधारात आहे. या ठिकाणी असलेले सावंत रोहीत्र बंद पडलेल्या आहे. त्यामुळे गावातील वीज पुरवठा खंडित झालेला आहे. दहा दिवस उलटूनही अठरा फाटा येथे वीजपुरवठा सुरळीत यश आले नाही. त्यामुळे ग्रामस्थ संपर्कक्षेत्राबाहेर आहेत.या ठिकाणी गावातील नागरिकांना वीज वितरण विभागाला लेखी तक्रार दाखल केलेली आहे. सबंधित विभागाने तुमी वीज बिल भरा मग रोहीत्र जोडला जाईल, असे उत्तर देण्यात आले आहे.
या रोहीत्रावर काही शेतपंप आहे. त्याचे बिले थकबाकी आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे हाल होत आहे. या ठिकाणी गावातील नागरिकांना सिंगल फेज लाईट देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.या काळात गावात कोणीही अभियंता किंवा वायरमन फिरकले नसल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. बंद पडलेल्या रोहीत्राकडे दुर्लक्ष होत असुन गावात नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा खंडित झालेले आहे.
दहा दिवसांपासून अठरा फाटा परिसरात रोहित्र दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले आहे. परंतु अद्यापही दुरुस्त केलेला रोहित्र न आल्याने सध्या गाव अंधारात आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे .दळणासाठी शेजारच्या गावातया भागातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने दैनंदिन जीवनावरही परिणाम झाला आहे. ग्रामस्थांना दळणासाठी शेजारच्या गावात जावे लागत आहे. ज्यांच्या घरी पुरुष मंडळी नाही, त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.