सातारा : बोरगाव पोलिस ठाणे हद्दीतील बेकायदा दारूविक्री करणाऱ्या महिलेसह तिघांना जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी एक वर्षासाठी माण, फलटण व महाबळेश्वर तालुका वगळता जिल्ह्यातून तडीपार केले आहे.याबाबत माहिती अशी की, शकिला गुलाब मुलाणी (वय ५०) , समीर गुलाब मुलाणी व अमीर गुलाब मुलाणी हे मायलेकरांची टोळी बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा देशीदारूची विक्री करत होते. त्यांच्यावर वारंवार गुन्हे दाखल करून अटक केली. तसेच सुधारण्याची संधीही देण्यात आली.
मात्र वर्तवणूक बदल न झाल्याने व त्यांच्या उपद्रवाचा त्रास इतरांना होऊ नये, यासाठी बोरगाव पोलिसांनी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव दाखल केला होता.
त्यास मंजूर देऊन तीन जणांना सातारा, कोरेगाव, खटाव, वाई, खंडाळा, जावळी, पाटण, कऱ्हाड या आठ तालुक्यांतून हद्दपारीचे आदेश दिले आहेत. आदेशाची बजावणी झाल्यानंतर त्यांनी ४८ तासांच्या आत हद्दपार करणे बंधनकारक आहे