सातारा : नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. यावर्षी आतापर्यंत किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली आले असून, दिवसेंदिवस चढ-उतार होत आहे. साताऱ्याचे शनिवारी किमान तापमान १४.०९ तर रविवारी सकाळी १६ अंशावर होते.नोव्हेंबर महिन्यापासून जिल्ह्यात थंडीस सुरुवात झाली आहे. मात्र, प्रारंभी थंडीचे प्रमाण कमी होते. तर पहाटेच्या सुमारास थंडीची तीव्रता वाढत होती. तरीही जिल्ह्यातील किमान तापमान १९ ते २० अंशाच्या दरम्यान होते. असे असताना डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून मात्र, थंडीच्या तीव्रतेत मोठी वाढ झाली आहे.
हळूहळू किमान तापमान खाली येऊ लागले आहे. त्यातच थंड वाऱ्याची झुळुक वाहू लागली आहे. परिणामी सायंकाळपासूनच गारठ्यात वाढ होत आहे. रात्री नऊनंतर तर ऊबदार कपडे घालून बाहेर पडण्याशिवाय पर्याय राहत नाही. या थंडीमुळे मोठ्या शहरातील बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे.सातारा शहरातील किमान तापमान यावर्षी आतापर्यंत १२ अंशापर्यंत खाली आले आहे. त्यातच किमान तापमानात चढ-उतार होत आहे. १२ ते १८ अंशाच्या दरम्यान किमान तापमान राहत आहे.
शनिवारी किमान तापमान १४.०९ होते तर रविवारी तापमानात वाढ होऊन ते १६ अंशावर गेले. ग्रामीण भागातही थंडीची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. पहाटेपासूनच शेकोट्या पेटवण्यात येत आहेत.
आतापर्यंतचे निच्चांकी तापमान १२ पर्यंत...थंडीत चढ-उतार सुरू : साताºयात शनिवारी १४.९ तर रविवारी किमान तापमान १६ अंशावरसातारा : नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. यावर्षी आतापर्यंत किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली आले असून, दिवसेंदिवस चढ-उतार होत आहे. साताºयाचे शनिवारी किमान तापमान १४.०९ तर रविवारी सकाळी १६ अंशावर होते.नोव्हेंबर महिन्यापासून जिल्ह्यात थंडीस सुरुवात झाली आहे. मात्र, प्रारंभी थंडीचे प्रमाण कमी होते. तर पहाटेच्या सुमारास थंडीची तीव्रता वाढत होती. तरीही जिल्ह्यातील किमान तापमान १९ ते २० अंशाच्या दरम्यान होते. असे असताना डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून मात्र, थंडीच्या तीव्रतेत मोठी वाढ झाली आहे. हळूहळू किमान तापमान खाली येऊ लागले आहे. त्यातच थंड वाºयाची झुळुक वाहू लागली आहे. परिणामी सायंकाळपासूनच गारठ्यात वाढ होत आहे. रात्री नऊनंतर तर ऊबदार कपडे घालून बाहेर पडण्याशिवाय पर्याय राहत नाही. या थंडीमुळे मोठ्या शहरातील बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे.सातारा शहरातील किमान तापमान यावर्षी आतापर्यंत १२ अंशापर्यंत खाली आले आहे. त्यातच किमान तापमानात चढ-उतार होत आहे. १२ ते १८ अंशाच्या दरम्यान किमान तापमान राहत आहे. शनिवारी किमान तापमान १४.०९ होते तर रविवारी तापमानात वाढ होऊन ते १६ अंशावर गेले. ग्रामीण भागातही थंडीची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. पहाटेपासूनच शेकोट्या पेटवण्यात येत आहेत.