शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

सातारा : टोल नाका चालविणाऱ्या खंडणीबहाद्दरांनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 6:32 PM

नेहमीच कुचकामी ठरलेल्यांना निवडणूक आली की, वेळ मारून नेण्यासाठी हे नाही केले तर, मिशा काढीन. ते नाही केले तर, भुवया काढीन अशी डायलॉगबाजी करावी लागली आहे. एक खंडणी मागणे, दुसरे टोल नाका चालवणे आणि तिसरे गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर शिक्के मारून त्यांना देशोधडीला लावणे यासारखी विकासकामे आमच्या हातून झाली नाहीत आणि होणारही नाहीत,ह्ण असा घणाघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कोणाचेही नाव न घेता केला.

ठळक मुद्देटोल नाका चालविणाऱ्या खंडणीबहाद्दरांनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावलेशिवेंद्रसिंहराजेंचा घणाघात : उदयनराजेंच्या टीकेनंतर दोन्ही राजेंमध्ये वाद पुन्हा पेटला

सातारा : नेहमीच कुचकामी ठरलेल्यांना निवडणूक आली की, वेळ मारून नेण्यासाठी हे नाही केले तर, मिशा काढीन. ते नाही केले तर, भुवया काढीन अशी डायलॉगबाजी करावी लागली आहे. एक खंडणी मागणे, दुसरे टोल नाका चालवणे आणि तिसरे गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर शिक्के मारून त्यांना देशोधडीला लावणे यासारखी विकासकामे आमच्या हातून झाली नाहीत आणि होणारही नाहीत,ह्ण असा घणाघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कोणाचेही नाव न घेता केला.राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीका केली होती, या पार्श्वभूमीवर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, ह्य४० वर्षे आमच्याकडे सत्ता होती. सत्ता सातारकरांनी, जनतेनं आम्हाला दिली आणि तुम्हाला का घरी बसवले होते? याचेही आत्मपरीक्षण करा.

शेवटी सत्तेत येण्यासाठी कोणाच्या मदतीचा हात हातात घ्यावा लागला, याचेही आत्मपरीक्षण त्यांनी केले पाहिजे. ४० वर्षांत भाऊसाहेब महाराज आणि त्यांच्यानंतर मी काय केले, हे तमाम जनतेला माहिती आहे. त्यामुळेच आम्हाला सत्ता मिळाली, हे आम्ही कदापिही विसरत नाही. गेली १०-१५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून मिरवताना ज्या भागाचे लोकप्रतिनिधी आहोत, त्या भागात आपण काय दिवे लावले? याचीही कबुली आपण दिली पाहिजे. केवळ घोकमपट्टी करून आणि थापेबाजी करून विकासकामे होत नसतात.टीका, शंखध्वनीला फारशी अक्कल लागत नाही, त्याचप्रमाणे थापा मारायलाही फारशी अक्कल लागत नाही, हे साताऱ्यातीलच काही लोकप्रतिनिधींमुळे खरे ठरले आहे. स्वत:चे गुण स्वत:चं जाहीर केले ते बरे झाले. चुना, तंबाखू, सिगारेट, गुटखा, दारू या कोणाच्या आवडीच्या गोष्टी आहेत, हे सातारकरच नाही तर सबंध महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे शंखध्वनी कोण मारतो, हेही सगळ्यांना कळून चुकले आहे.निवडून आल्यानंतर गेल्या १०- १५ वर्षांत किती विकासकामे मंजूर केली आणि किती पूर्णत्वास नेली, हा संशोधनाचा भाग आहे. किमान मी बोलल्यामुळे तरी, अशांना आपणही काहीतरी काम करून दाखवले पाहिजे, याची किमान जाणीव तरी झाली. हेही नसे थोडके, असे खेदाने म्हणावे लागेल.

आता निवडणुका तोंडावर आल्या की हातात नारळ घेऊन दुसऱ्यांनी मंजूर केलेल्या कामांचा प्रारंभ करायचा आणि लोकांचा बुद्धिभेद करण्यासाठी दुसऱ्यांना नावे ठेवायची, हा नवीन धंदा सुरू केला आहे. अशांनी इंजिनिअरने लिहिलेली कामाची यादी वाचून दाखवायची आणि ही कामे मीच केली, असा ढोल बडवायचा. स्वत: काही करायचे नाही; पण दुसऱ्याने मंजूर केलेल्या कामाच्या कोनशीलेवर माझे नाव लागले पाहिजे, हा अट्टाहास पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते करायचे. कामासाठी नाही तर फक्त नावासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मिरवायचे आणि दुसºयाला शहाणपण शिकवायचे, हे आता थांबले पाहिजे, असेही या पत्रकात म्हटले आहे.सांगता येईल असे एखादे तरी काम करा...नुसतीच बडबड आणि बोलबच्चनगिरी करण्यापेक्षा किमान लोकांना सांगता येईल, असे एखादे तरी काम करा. तेच-तेच गोल फिरवून फिरवून आता त्याचे वाटोळे झाले आहे. त्यामुळे फुका बाता मारण्यापेक्षा स्वत: काहीतरी करून दाखवा आणि मग बढाया मारा, असा उपरोधिक टोलाही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला आहे.लोकांना किती भूलविणार...तीन-चार वर्षांपूर्वी पालिकेतल्याच एका विद्वान वकिलाने साताऱ्यात पासपोर्ट आॅफिस येणार, अशी बातमी देऊन मोठी दवंडी पिटली होती. पासपोर्ट आॅफिस साताऱ्यांत आले पाहिजे. लोकांना सुविधा मिळालीच पाहिजे. चार वर्षे झाले तरी पासपोर्ट आॅफिस काय साताऱ्यात आले नाही; पण आता नव्याने हे आॅफिस साताऱ्यात येणार, अशी पुन्हा बातमी तरी आली. पासपोर्ट आॅफिस, रेल्वे आॅफिस, विमानतळ अरे किती गाजरे दाखवणार आणि जनतेला भूलविणार, असा सवालही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केला आहे.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसर