सातारा : वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे दि. १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून तब्बल ८३ लाख ६७ हजार २०० रुपये अनामत रक्कम वसूल करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे यांनी दिली.वाहतूक शाखेकडून २०१६ मध्ये ५९ लाख ४३ हजार ४०० इतकी अनामत रक्कम वसूल करण्यात आली होती. तर गेल्या वर्षी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या, नंबरप्लेट नसणाऱ्या, ट्रीपल सीट तसेच विना परवाना वाहन चालविणाऱ्या एकूण ३६ हजार १०५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ८२ वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्या विरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहे.
वर्षभरात करण्यात आलेल्या या कारवाईतून तब्बल ८३ लाख ६७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग खंडेराव धरणे तसेच वाहतूक शाखेचे कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.