शहरं
Join us  
Trending Stories
1
सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
2
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
3
Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट
4
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
5
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
6
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
7
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
9
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
10
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
11
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
12
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
13
मोठी बातमी: निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
14
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
15
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
16
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
18
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
19
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
20
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार

सातारा : वेळूत ग्रामस्थांनी दोन एसटी रोखल्या, महामंडळाच्या कारभाराचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 12:53 PM

कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे सकाळी साडेआठ वाजता येणारी व सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान येणारी अशा दोन बंद केलेल्या एसटी तत्काळ सुरू कराव्यात, या मागणीसाठी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी सोमवारी दोन एसटींची तब्बल दोन तास वाहतूक रोखली.

ठळक मुद्देवेळूत ग्रामस्थांनी दोन एसटी रोखल्या, महामंडळाच्या कारभाराचा निषेध पोलिसांच्या आश्वासनानंतर माघार

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे सकाळी साडेआठ वाजता येणारी व सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान येणारी अशा दोन बंद केलेल्या एसटी तत्काळ सुरू कराव्यात, या मागणीसाठी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी सोमवारी दोन एसटींची तब्बल दोन तास वाहतूक रोखली.वेळू येथील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी दररोज रहिमतपूर व कोरेगाव येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. दररोज सकाळी साडेआठ वाजता कोरेगाव-वेळू व सायंकाळी साडेपाच वाजता सातारा-कामथी अशा दोन एसटी येत असल्यामुळे विद्यार्थ्यांची सोय होत होती.

मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या दोन्हीच्या एसटी अचानक बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या बंद केलेल्या एसटी सेवा पुन्हा पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने यापूर्वी वारंवार करण्यात आली.मात्र, एसटी महामंडळाचे अधिकारी या मागण्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत. सकाळच्या वेळेत एसटी नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास उशीर होतो. तर संध्याकाळी साडेपाच वाजता येणारी एसटीही बंद झाल्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींना रात्री-अपरात्री घरी यावे लागते.

साप येथून कोरेगावला जाणारे व साताऱ्याला जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला अनेकांनी मिळेल त्या वाहनातून रहिमतपूर गाठले. दरम्यान, एसटीची वाहतूक रोखल्याची माहिती रहिमतपूर पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहचून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची समजूत काढून एसटींची वाहतूक पूर्ववत केली.विनंतीला महामंडळाचा कोलदांडा..विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी ग्रामस्थांनी एसटी महामंडळाला केलेल्या विनंतीला महामंडळ कोलदांडा लावत असल्यामुळे नाईलाजाने ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना एसटी आडवाव्या लागल्या, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. सोमवारी सकाळी कोरेगाव-वेळू व सातारा-वेळू अशा दोन एसटी ग्रामपंचायत कार्यालयासमोर तब्बल दोन तास अडवून ठेवण्यात आल्या होत्या.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळSatara areaसातारा परिसर