सातारा: सातारा बाजार समितीमध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील अजिंक्य पॅनलने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनलचा सुफडा साफ सर्व १८ जागांवर दणदणीत विजय मिळवला. विजयानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची जोरदार उधळण करत जल्लोष केला.
सातारा बाजार समितीच्या १८ जागांसाठी दि. ३० एप्रिल रोजी मतदान झाले होते तर १ मे रोजी निकाल होता. त्यानूसार जिल्हा नागरी बँक असोसिएशनच्या सभागृहामध्ये सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंध शंकर पाटील यांच्या अधिपत्याखाली दहा टेबलवर मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीला सर्व मतदार संघातील मतपत्रिका वेगळ्या करण्यात आल्या. त्यानंतर सर्व मतदार संघातील मतमोजणी एकच वेळी हाती घेण्यात आली.
निकाल ऐकण्यासाठी दोन्हीं पॅनलच्या उमेदवार तसेच समर्थकांची मतमोजणी केंद्राच्या आवारात गर्दी झाली होती. व्यापारी मतदार संघातून हमाल मापाडी मतदार संघातून अमिन शकुर कच्छी व बाळासाहेब यशवंत घोरपडे निवडून येताच अजिंक्य पॅनलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. यानंतर सोसायटी मतदार संघातील आणि ग्रामपंचायत मतदार संघातील जागांचा निकाल लागला. सर्व १८ जागांवर अजिंक्य पॅनेलने मोठ्या मतांनी दणदणीत विजय मिळवला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनलने खासदार उदयनराजे आणि राष्ट्रवादीची घेतलेली मदत निष्फळ ठरली. स्वाभिमानीला भोपळाही पडता आला नाही.
अजिंक्य पॅनेलचे विजयी उमेदवार
सोसायटी मतदारसंघसर्वसाधारणरमेश विठ्ठल चव्हाण १२५६ धनाजी जाधव १२२४ राजेंद्र महादेव नलावडे १२५४ मधुकर परशुराम पवार १३०४विक्रम लालासो पवार १२७८विजय उत्तम पोतेकर १२८९भिकू भाऊ भोसले १२६२
महिला प्रतिनिधीवंदना किशोर कणसे १३३८आशा मंगलदास गायकवाड १३०४
इतर मागास प्रवर्गइसुब शमशुद्दीन पटेल १२९७
वि.जा.भ.ज.दत्तात्रय लक्ष्मण कोकरे १३१४
ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारणआनंदराव कल्याणराव कणसे ११३९अरुण बाजीराव कापसे ११००
अनुसुचित जाती / जमातीशैलेंद्र राजाराम आवळे ११०९
आर्थिक दुर्बल घटक संजय ज्ञानदेव पवार ११०३
व्यापारी आडते मतदार संघअमिन शकुर कच्छी (फजलानी) ६३३बाळासाहेब यशवंत घोरपडे ६६८
हमाल मापाडी अनिल बळवंत जाधव ३९