पिंपोडे बुद्रुक : वातावरणात थंडीचे प्रमाण कमी होऊन उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने ग्रामीण भागातील महिलांमध्ये उन्हाळी पदार्थ घरीच करण्याच्या कामांची लगबग सुरू झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे.मार्च महिन्यात होळीचा सण झाला की वातावरणातील थंडी गायब होऊन उन्हाळ्याची चाहूल लागते. या काळात शेतात रब्बी हंगामाचीही धामधूम सुरू असते. याचवेळी ग्रामीण भागातील महिला उन्हाळी कामात व्यस्त असल्याचे पाहावयास मिळते.सद्य:स्थितीत ग्रामीण भागातील महिला शेवया, पापड, सांडगे, कुरवड्या यासारख्या कामांत मग्न आहेत. अलीकडील काळात यांत्रिकीकरणामुळे महिलांची कामे कमी कष्टाची व कमी वेळेत होत असल्याने महिलांच्या कामात सुलभीकरण झाले असले तरी हातांनी बनविलेल्या पदार्थांची चव काही औरच असल्याने उन्हाळी कामे घरीच करण्यावरच महिलांचा भर असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे अचानक निर्माण होणाऱ्या ढगाळ हवामानामुळे केलेले पदार्थ वाळवण्यासाठी महिलांना कसरत करावी लागत आहे.
सातारा : ग्रामीण भागातील महिला उन्हाळी कामात व्यस्त, पदार्थ घरी बनविण्यावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:33 AM
वातावरणात थंडीचे प्रमाण कमी होऊन उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने ग्रामीण भागातील महिलांमध्ये उन्हाळी पदार्थ घरीच करण्याच्या कामांची लगबग सुरू झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे.
ठळक मुद्देग्रामीण भागातील महिला उन्हाळी कामात व्यस्त, पदार्थ घरी बनविण्यावर भरशेवया पापड, सांडगे, कुरवड्याच्या कामात मग्न