शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

डॉक्टर, नर्स झोपेत असताना तरुणाचा तडफडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 3:23 PM

सिव्हिलमधील धक्कादायक प्रकार; हलगर्जीपणाचा नातेवाइकांचा आरोप

सातारा : एक बावीस वर्षीय तरुण तडफडत मृत्यूशी झुंज देत असताना सिव्हिलमधील डॉक्टर आणि परिचारिका मात्र मध्यरात्री गाढ झोपेत होते. अखेर नातेवाइकांनी परिचारिकांना झोपेतून उठवून तरुणावर उपचार करण्यास सांगितले. परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता. संबंधित तरुणाने अक्षरश: तडफडून अखेर प्राण सोडले. या धक्कादायक प्रकारामुळे नातेवाइकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.विनायक बाळकेश्वर शिंगनाथ (वय २२, रा. केसरकर पेठ, सातारा) हा औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत काम करत होता. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास अचानक त्याला उलटी झाली आणि पोटातही दुखू लागले. त्यामुळे तो दुचाकीवरून स्वत: जिल्हा शासकीय रुग्णालयात गेला. डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर त्याला अ‍ॅडमिट व्हावे लागेल, असा सल्ला दिला. सिव्हिलमधील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये त्याला अ‍ॅडमिट करण्यात आले. सलाईन आणि इंजेक्शनद्वारे त्याच्यावर उपचार सुरू झाले. रुग्णालयात त्याच्यासोबत त्याचा भाऊ गणेश हा थांबला होता. इतर नातेवाईक घरी गेले होते.दरम्यान, रविवारी रात्री अडीचच्या सुमारास अचानक पुन्हा विनायकच्या पोटात दुखू लागले आणि जुलाबही होऊ लागले. त्यावेळी वॉर्डमध्ये परिचारिका व डॉक्टर कोणीच नव्हते. वॉर्डच्या बाहेर एका खुर्चीवर कपाऊंडर डुलक्या घेत होता. विनायकचा भाऊ गणेशने त्याला झोपेतून उठवले. तोपर्यंत विनायकची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली. परिचारिका व डॉक्टर दुसरीकडे गाढ झोपेत होते. त्यांना उठवण्यासाठी कंपाऊंडर गेला. त्यानंतर एका परिचारिकेने येऊन त्याला सलाईन लावले.भावाची अवस्था पाहून भांबावून गेलेल्या गणेशने हा प्रकार घरच्यांना सांगितला. केवळ पाच मिनिटांतच सर्व नातेवाईक सिव्हिलमध्ये आले. परंतु गाढ झोपलेले परिचारिका आणि डॉक्टर आले नाहीत. नातेवाइकांनीच त्यांना झोपेतून उठवले. विनायकवर उपचार सुरू झाले; परंतु त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. उपचारापूर्वीच त्याचा अखेर मृत्यू झाला.विनायकचा मृत्यू झाल्याची माहिती समजल्यानंतर त्याच्या नातेवाईक व मित्रांनी सिव्हिलमध्ये गर्दी केली. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन जमावाला शांत केले. गणेश शिंगनाथ याने पोलिसांना तक्रार अर्ज दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. झोपेतून उठताना रेकॉर्डिंग गाढ झोपलेल्या परिचारिका आणि डॉक्टरांचे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी मोबाईलवर रेकॉर्डिंग सुरू केले. त्यावेळी झटपट झोपेतून सर्वजण उठले. काहीजणांनी तोंड लपवले. संतप्त नातेवाइकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. या प्रकाराची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे.