सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्याकोल्हापूर विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत जिल्ह्याचा निकाल ८६.२६ टक्के लागला आहे. यंदाही मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक आहे. विद्यार्थ्यांना १२ जून रोजी गुणपत्रिका देण्यात येणार आहे.फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये सातारा जिल्ह्यातील ४९ परीक्षा केंद्रांमधून ३८ हजार १९८ विद्यार्थी बारावी परीक्षेसाठी बसले होते. यात १७ हजार २७२ मुले आणि १५ हजार ८९८ मुलींचा समावेश आहे. पुनर्परीक्षार्थीमध्ये जिल्ह्यातून १ हजार १४५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी अवघे २१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात बारावीचा निकाल आॅनलाईन लागणार म्हटल्यावर विद्यार्थी तणावात होते. दुपारी निकाल आॅनलाईन लागल्यानंतर काही काळ सर्व्हरवर ताण पडला. विद्युुत पुरवठा खंडित झाल्यामुळे निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांना ताटकळत बसावं लागलं. अनेकांनी मोबाईलवर तर काहींनी प्रिंट मिळावी, या उद्देशाने नेटकॅफेवर जाऊन निकाल पाहिला. उत्तीर्ण झाल्याचे समजताच अनेकांनी याची माहिती समाजमाध्यमांद्वारे व्हायरल केली. त्यामुळे निकाल पाहणे अनेकांना सोपे गेले आहे.निकाल बघायला पाच तर प्रिंटला दहा रुपये...महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेबु्रवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन जाहीर झाला. कºहाड तालुक्यातील महाविद्यालयातील बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी हा निकाल पाहिला. शहरातील विद्यार्थ्यांनी कºहाड, मलकापूर, विद्यानगर येथील शहरात नेट कॅफेमध्ये आॅनलाईन वेबसाईटवर निकाल पाहिला. मात्र, मंगळवार असल्याने शहरातील बहुतांश नेटकॅफे बंदच होते. जी सुरू होती, त्यामध्ये निकाल बघायला पाच तर निकालाची प्रिंट काढायला दहा रुपये आकारले गेले. कºहाड शहरात शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय तर विद्यानगर येथे यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय, वेणूताई चव्हाण महाविद्यालयत, तसेच सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय अशी महाविद्यालये आहेत. त्यामधील इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांपैकी कोणी मोबाईलवर घरबसल्या तर कोणी नेट कॅफेत जाऊन आपला बारावीचा निकाल पाहिला.पेढ्यांचीही मागणी वाढलीकोणती आनंदाची गोष्ट असेल तर सर्वांना प्रथम पेढे देऊन ती सांगितली जाते. मंगळवारी दुपारी एक वाजता बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला. हा निकाल कºहाड तसेच विद्यागनगर येथील नेटकॅफेत जाऊन विद्यार्थ्यांनी बघितला. बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे समजताच काहींनी शहरातील स्वीट मार्ट तसेच पेढे, मिठाईच्या दुकानात जाऊन पेढेही खरेदी केले. बारावी परीक्षेचा निकाल लागणार म्हटल्याने शहरातील पेढे विक्री करणाऱ्या दुकानदारांनीही उत्तम प्रतिचे पेढे विक्रीसाठी ठेवले होते.गुणसुधार योजनासर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी या योजनेची मदत होते. त्यानुसार बारावी परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांसाठी जुलै-आॅगस्ट २०१९ आणि फेब्रुवारी मार्च २०२० अशा दोनच संधी गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध आहेत.उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनफेब्रुवारी-मार्च २०१९ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दुसºया दिवसापासून त्यापुढील पाच कार्यालयीन कामाच्या दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात शुल्क भरून विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांना अर्ज करणे आवश्यक राहील.जिल्ह्यातील शाखानिहाय यादीशाखा नोंदणी प्रविष्ठ उत्तीर्ण उत्तीर्णतेचीविद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थी टक्केवारीविज्ञान १५,८८५ १५,८७७ १४,९८१ ९४.३६कला ११,७८३ ११,७६४ ८,३७० ७१.१५वाणिज्य ८,७७५ ८,७६० ८,१२२ ९२.७२व्यावसायिकविषय १,७९८ १,७९७ १,४७८ ८२.२५