शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
3
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
4
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
5
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
6
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
7
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
8
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
9
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
10
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
11
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
12
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
13
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
14
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
15
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
16
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

तीन आठवड्यांत ३६ हजार घरकुलांना मंजुरी!, सातारा जिल्हा परिषदेची दमदार कामगिरी

By नितीन काळेल | Updated: February 28, 2025 13:37 IST

आता ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइन

नितीन काळेलसातारा : घरकुलमधील प्रधानमंत्री आवास योजनेमधून सर्वाधिक घरांची तरतूद आहे. या योजनेतून सातारा जिल्ह्यात सहा वर्षांत १४ हजारांवर घरे मंजूर झाली; पण आताच्या टप्पा दोनमध्ये या योजनेतूनच तब्बल ३६ हजार घरकुलांना अवघ्या तीन आठवड्यांत मंजुरी देण्यात आली. त्यातील २५ हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ताही मिळाला आहे. जिल्हा परिषदेची ही कामगिरी दमदार ठरली आहे.

प्रधानमंत्री आवास हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर १०० दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमानुसार राज्यात २० लाख घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनमधून ४५ हजार ४२२ एवढ्या मोठ्या संख्येने घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जानेवारी महिन्यातच साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन पुढील १०० दिवसांत जिल्ह्यातील सर्व घरकुलांना मंजुरी देण्याचा विश्वास व्यक्त केला होता. हा विश्वास जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सार्थ ठरवला आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली घरकुलांना मंजुरी देण्यासाठी यंत्रणा राबवली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी आणि तालुकास्तरावरील अधिकारी, ग्रामपंचायतीमधील अधिकाऱ्यांच्या मदतीने अवघ्या तीन आठवड्यांतच जिल्ह्यातील ३६ हजार ६८३ घरकुलांना मंजुरी देण्यात यश आले. यासाठी अधिकाऱ्यांनी दिवसाबरोबरच रात्रीही काम केले. त्यामुळे राज्यात सातारा जिल्हा आघाडीवर राहिला. तर मंजूर घरकुलांपैकी २५ हजार १७५ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर १५ हजार रुपयांचा पहिला हप्ताही जमा झाला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी घरकुलाचे कामही सुरू केले आहे. प्रधानमंत्री आवास टप्पा दोनमधील घरकुलांमुळे जिल्ह्यात आता बेघर असणाऱ्यांची संख्या एकदम कमी झाली आहे. उर्वरित पात्र लोकांनाही घरकुल मिळणार आहे. त्यासाठी लवकरच सर्व्हेही सुरू होणार आहे.

प्रधानमंत्री घरकुल टप्पा दोन घरकुल मंजूर..तालुका - मंजुरी पत्र - वितरण प्रथम हप्ता जमापाटण - ७,३४४ - ४,५०५सातारा - ५,०४३ - २,७९९कऱ्हाड - ४,७०५ - ३,८७६खटाव - ३,९४० - २,९९८कोरेगाव - ३,४१३ - २,०३४फलटण - ३,३९२ - २,१४०माण - ३,०२९ - २,३८८जावळी - १,९०३ - १,२४१वाई - १,७९३ - १,३८५खंडाळा - १,३६६ - १,०५२महाबळेश्वर - ८५५ - ७५७एकूण - ३६,६८३ - २५,१७५

आता ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइन..सातारा जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास ग्रामीण टप्पा दोनमधून आतापर्यंत ३६ हजार ६८३ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. ही घरकुले १०० दिवसांत म्हणजे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याबाबत नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे घरकुल मंजुरीप्रमाणेच बांधकामातही सातारा आघाडीवर राहणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाzpजिल्हा परिषद