सातारा : मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी आरक्षण सोडत झाली. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेसाठी ७३ पैकी ३७ गट महिलांसाठी राखीव झाले आहेत. तर सर्व मिळून खुला प्रवर्ग ४५, ओबीसी १९, अनुसूचित जाती ८ आणि जमातीसाठी एक गट आहे.सातारा जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांची पाच वर्षांची मुदत २० मार्चला संपली. पण, त्यावेळी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी सत्तेवरील महाविकास आघाडी सरकारने कायदा करून निवडणूक पुढे ढकलली होती. गुरुवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी आरक्षण सोडत झाली. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि महसूलचे उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी आरक्षण सोडत जाहीर केली.त्यानुसार खुल्या प्रवर्गासाठी ४५ जागा, ओबीसींसाठी १९ तर अनुसूचित जाती ८ आणि अनुसूचित जमातीसाठी एक जागा राखीव झाली. तर खुल्या प्रवर्गातील २३, ओबीसी प्रवर्ग १० आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील ४ गट महिलांसाठी राखीव झाले. एकूण ७३ पैकी ३७ गट सर्व प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.
खुला प्रवर्ग ६, ओबीसींचे २ सदस्य वाढले...
महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्हा परिषद गटांची संख्या वाढविण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील गटांची संख्या ९ ने वाढून ६४ वरून ७३ वर गेली. यामध्ये खुला प्रवर्ग ६, ओबीसी २ आणि अनुसूचित जातीचा एक सदस्य वाढला आहे.
तालुकानिहाय गट असे राहणारसातारा १० ,कऱ्हाड १४ , वाई ०५, महाबळेश्वर ०२, माण ०५, खटाव ०८, कोरेगाव ०६, जावळी ०३, खंडाळा ०३, पाटण ०८, फलटण ०९२ ऑगस्टपर्यंत हरकती
जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण जाहीर करण्यात आले. या आरक्षणावर कोणाच्या हरकती असतील तर त्या २ ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर अंतिम आरक्षण ५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.
तालुकानिहाय गट आरक्षण असे :खंडाळा तालुकाशिरवळ - सर्वसाधारण महिलाभादे - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाखेड बुद्रुक- नागरिकांचा मागास प्रवर्ग
फलटण तालुकासर्वसाधारण गटतरडगाव, साखरवाडी, सांगवी, विडणी, गुणवरे, बरड, हिंगणगावसर्वसाधारण महिला - कोळकी, वाठार निंबाळकर
माण तालुकाआंधळी, बिदाल - सर्वसाधारण महिलामार्डी, गोंदवले बुद्रुक, कुकुडवाड - सर्वसाधारणखटाव तालुकाबुध, पुसेगाव, खटाव, निमसोड, पुसेसावळी, मायणी - सर्वसाधारणसिद्धेश्वर कुरोली - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
औंध - सर्वसाधारण महिलाकोरेगाव तालुकापिंपोडे बुद्रुक - नागरिकांचा मागास प्रवर्गसातारारोड - अनुसूचित जातीकुमठे - सर्वसाधारण -
एकंबे, वाठार किरोली, वाठार स्टेशन - सर्वसाधारण महिलावाई तालुकापसरणी - सर्वसाधारणकेंजळ - अनुसूचित जमातीओझर्डे- नागरिकांचा मागास प्रवर्ग
बावधन - अनुसूचित जातीभुईंज - सर्वसाधारण महिलामहाबळेश्वर तालुकातळदेव - सर्वसाधारण महिलाभिलार - सर्वसाधारण महिला
जावळी तालुकाम्हसवे - सर्वसाधारण महिलाकुडाळ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
कुसुंबी - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासातारा तालुकालिंब, पाटखळ, देगाव, नागठाणे - सर्वसाधारण महिलाखेड, कारी - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाकोडोली - अनुसूचित जाती
कोंडवे, पाडळी - नागरिकांचा मागास प्रवर्गअपशिंगे सर्वसाधारणपाटण तालुकागोकुळ तर्फ हेळवाक - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलातारळे, मारुल हवेली - सर्वसाधारण
म्हावशी, धामणी - सर्वसाधारण महिलामल्हारपेठ, नाटोशी - अनुसूचित जाती महिला
मंद्रुळकोळे - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाकऱ्हाड तालुकापाल, वारुंजी, कार्वे, काले - सर्वसाधारण महिला
उंब्रज, सैदापूर, रेठरे बुद्रुक - नागरिकांचा मागास प्रवर्गमसूर - सर्वसाधारण
कोपर्डे हवेली, येळगाव - अनुसूचित जाती महिलाचरेगाव, विंग, वडगाव हवेली - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
तांबवे - अनुसूचित जातीविंग - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला