योगेश घोडके ।सातारा : जिल्ह्यातील बालमृत्यू कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना तयार करण्यात आल्या आहेत. त्यातील एक म्हणजे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजना. या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेने २०१५ पासून आजअखेर एकूण ४९९ हृदय शस्त्रक्रिया केल्या आहेत. जिल्हा परिषदेंतर्गत शुक्रवारी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सोहळा पार पडला.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेंतर्गत ०-१८ वयोगटांतील बालकांची व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. या आरोग्य तपासणीमध्ये आरोग्य विभागामार्फत जे पथक कार्यरत आहेत. त्यामार्फत ०-१८ वयोगटांतील बालकांची तपासणी करून त्यामध्ये रोगनिदान व उपचार करणे, जीवनसत्त्व कमतरता ओळखणे, शारीरिक व्यंग निदान ओळखणे, गतिमंद ओळखणे या सर्व आरोग्यविषयक समस्या ओळखून त्यांच्यावर योग्य वेळेवर उपाययोजना करून बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, हा उद्देश असतो.
शासनाच्या सर्वेक्षणाच्या संशोधनाप्रती दरवर्षी १०० बालकांच्या जन्मामागे ७ बालके जन्मत:च व्यंग असतात. सुमारे १७ लाख बालके जन्मत:च व्यंग असतात. त्यामुळे ९.६ टक्के बालमृत्यू होतात. आहारामधील जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे ४ ते ७० टक्के बालके असतात. यात दहा टक्के बालकांमध्ये दोष आढळतात. वेळीच उपचार केले नाही तर त्यांच्यामध्ये पुढे आनुवंशिक, दृष्टिकोष, बहिरेपण व इतर स्वरुपाचा दोष निर्माण होतात.
लहान बालकांमध्ये श्वसन संस्थेचे, आजार, किडनीविकार, अस्थिविकार व मेंदूविकार प्रामुख्याने आढळतात. त्यांच्यावर वेळीच उपचार केले तर बालकांचे भविष्य व पुढील आयुष्य निरोगी राहण्यास मदतहोते. जिल्हा परिषद आयोजित राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातजिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.रहिवासी नसताना शस्त्रक्रिया मोफत..राहुल यादव हा मूळचा बिहारचा रहिवासी. दाखले नसताना योजनेचा लाभ मिळत नव्हता. अधिकाऱ्यांनी रुग्णालयाशी बोलून शस्त्रक्रिया केली.
कोरेगाव येथील श्रद्धा मदने हिला मुंबईत रुग्णालयात दाखल केले. शस्त्रक्रिया न होता पाठविले. हा विषय समजताच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून बाळास नवजीवन दिले.-डॉ. कैलास शिंदेवर्ष आरोग्य तपासणी तपासणी केलीसंख्या संख्या२०१५-१६ २,१०, ८१८ २,०९,९३२२०१६-१७ २,०६,०४४ २,०४,७३९२०१७-१८ १,९७,३४९ १,९६,३६७२०१८-१९ १,९७,३४९ ८०,५२५हृदय शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया शस्त्रक्रियावर्ष करण्याची संख्या के लेली संख्या२०१५-१६ १८५ १६९२०१६-१७ १२९ १२७२०१७-१८ १३१ ११६२०१८-१९ ८ ७वर्ष शस्त्रक्रिया शस्त्रक्रियाकरण्याची संख्या क ेलेली संख्या२०१५-१६ ११२४ ११०१२०१६-१७ ११६० ११५९२०१७-१८ ११७९ ११७६२०१८-१९ ५८ ५८